बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा सध्याचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने बंगळुरूच्या स्टेडियमवर उपस्थितांना देशप्रमाचे दर्शन घडवले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मैदानात देशप्रेमाचे दर्शन घडवल्याबद्दल विराटवर चाहत्यांकडून स्तुतीसुमने उधळली जात आहेत.

झालं अस की, बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात विराट कोहली सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असताना उपस्थित प्रेक्षकांनी विराट..विराट..नावाचा जयघोष सुरू केला होता. यावेळी विराटने प्रेक्षकांकडे पाहून आपल्या टीशर्टवर छापलेल्या देशाच्या नावाकडे बोट दाखवून इंडिया…इंडिया असा जयघोष करा असे आवाहन प्रेक्षकांना केले. मग प्रेक्षकांनीही विराटच्या आवाहनाला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊन भारताच्या नावाचा जल्लोष सुरू केला. दरम्यान, एका चाहत्याने हा व्हिडिओ टिपून सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ पाहून विराटचे सर्वस्तरांतून कौतुक केले जात आहे.

पाहा व्हिडिओ-