24 April 2018

News Flash

नोबॉल व दव पराभवाला कारणीभूत -धोनी

दोन नोबॉल आणि दव हे घटक भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

दोन नोबॉल आणि दव हे घटक भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचून पराभव पत्करावा लागल्याचे दु:ख धोनीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते.
विजयासाठी १९३ धावांचे आव्हान पेलणाऱ्या विंडीजकडून लेंडल सिमन्सने नाबाद ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. सामनावीर सिमन्सला १८ आणि ५० धावांवर असताना जीवदाने मिळाली होती.
‘‘सामना अर्धा तास आधी सुरू झाला. नाणेफेकीचा कौलसुद्धा आम्ही गमावला. विंडीजने फलंदाजीला प्रारंभ केला, तेव्हा प्रारंभी सारे काही ठीक होते. मात्र कालांतरानेदवाच्या प्रभावामुळे फिरकी गोलंदाजांना मनाप्रमाणे गोलंदाजी करता आली नाही. या व्यतिरिक्त दोन नोबॉल हे आमच्यासाठी निराशाजनक ठरले,’’ असे धोनीने सांगितले.
‘‘एका ट्वेन्टी-२० विश्वचषकात एका वाईट सामन्यामुळे आमचे
आव्हान संपुष्टात आले होते. त्या सामन्यात दवाचा किंवा पावसाचाच बहुदा त्रास झाला होता,’’ असे धोनी म्हणाला.

First Published on April 2, 2016 4:41 am

Web Title: india vs west indies ms dhoni really disappointed with the two no balls by r ashwin and hardik pandya
  1. M
    mhasalkar
    Apr 4, 2016 at 6:36 am
    माझे मत असे आहे कि इन्दिअन तें देफ़ेअत कारणी एकमेव धोनी जबाबदार आहे. तो बात्तीन्ग्ला आला त्यावेळी त्याने त्याचा नैसर्गिक खेळ खेळला नाही. तो जर खेळला असता तर धावसंख्या निच्छितच २२० च्या वर गेली आस्ति. आणि आपल्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असता.
    Reply