ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर थोडे गवत ठेवण्यात आले असून याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांना मिळेल, असे म्हटले जात आहे. पण याचे कुठलेच दडपण विंडीजवर जाणवत नाही, तर दुसरीकडे इंग्लंडसाठी ही खेळपट्टी सुखावणारी नक्कीच असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडन गार्डन्सवर जेवढा पाठिंबा तुम्हाला चाहत्यांकडून मिळेल, तेवढी मदत तुम्हाला खेळपट्टीची मिळणार नाही, असा प्रश्न विचारल्यावर विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने चाणाक्षपणे उत्तर दिले. तो म्हणाला की, ‘‘आम्हाला फक्त २२ यार्ड लांब आणि सहा फूट रुंद खेळपट्टी असते एवढेच माहिती आहे.’’ यावरून आमच्यावर खेळपट्टीचे जास्त दडपण नाही. खेळपट्टी कशीही असली तरी आमच्याकडे त्यावर दमदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत, हे सॅमीला सांगायचे होते.

या खेळपट्टीवरचे गवत सुखावणारे आहे. आमच्या वेगवान गोलंदाजांना याचा फायदा घेता येईल. फरक फक्त एवढाच आहे की इंग्लंडसारखे वातावरण येथे नाही. नाही तर ही आमच्यासाठी घरचीच खेळपट्टी ठरू शकली असती.

– ईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No pitch pressure on the west indies team says eoin morgan
First published on: 03-04-2016 at 01:23 IST