News Flash

दूरदर्शन- भाग २

आपल्या आयुष्याचा आणि गप्पांचा अविभाज्य भाग बनलेल्या दूरदर्शनच्या तंत्राची काही मूलभूत माहिती आपण गेल्या आठवडय़ात घेतली.

| September 6, 2015 11:55 am

आपल्या आयुष्याचा आणि गप्पांचा अविभाज्य भाग बनलेल्या दूरदर्शनच्या तंत्राची काही मूलभूत माहिती आपण गेल्या आठवडय़ात घेतली. कॅथोड किरण-नलिकेचे (उफळ) स्वरूप व काम समजून घेतले. कॅथोडमधून निघालेला इलेक्ट्रॉनचा झोत फॉस्फरसचा थर असलेल्या पडद्यावर आपटतो आणि त्याला प्रकाशित करतो. पण हा झोत सर्व पडद्यावर फिरण्यासाठी दूरदर्शनच्या डब्यात कॅथोड किरण-नलिकेच्या बाहेर तारेची गुंडाळी असते. ही गुंडाळी आतमध्ये चुंबकीय बल तयार करते व त्यामुळे आतील इलेक्ट्रॉनचा झोत विस्थापित होतो आणि उभ्या-आडव्या दिशेने योग्य दिशेला वळवला जातो. हे करण्यासाठी तारेच्या गुंडाळ्याचे विभव नियंत्रित केले जाते आणि पूर्ण पडदा हवा तसा प्रकाशित होतो. चित्र क्र. १ मध्ये ही रचना दाखवली आहे. चित्रात दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या तारेमधून नलिकेच्या आतील बाजूस असलेल्या विद्युतवाहक थराला वीजपुरवठा केला जातो.हे दिशा दिलेले इलेक्ट्रॉन पडद्यापाशी जाऊन काय करतात, आणि चित्र उमटताना काय घडते, ते पाहू. उफळ पडद्याला आतल्या बाजूने संदीपकांचा  थर दिलेला असतो. ज्या पदार्थाचा अतिनील प्रारण अथवा इलेक्ट्रॉनशी संपर्क आला असता ते दृश्य प्रकाशकिरण प्रक्षेपित करतात त्यांना ‘संदीपक’ म्हणतात. प्रकाश पडल्यावर चकाकणारा कुठलाही पदार्थ ‘संदीपक’ असतो. कृष्णधवल दूरदर्शन संचातील उफळ च्यापडद्यावर फक्त पांढरा रंग प्रसारित करणारे संदीपक असतात, तर रंगीत दूरदर्शन संचातील पडद्यावर लाल, हिरवा व निळा रंग प्रसारित करणारे संदीपक असतात. आणि त्यांना उद्दीपित करण्यासाठी उफळ मध्ये तीन इलेक्ट्रॉन प्रक्षेपी असतात. इलेक्ट्रॉनचा झोत एखादा चित्रकार कॅनव्हास रंगवताना जो क्रम वापरतो तसाच क्रम वापरून पडद्यावर चित्र तयार करतो. एका वेळी एक रेषा- डावीकडून उजवीकडे- संपली की परत खालची रेषा- डावीकडून उजवीकडे.. असे पडदासंपेपर्यंत. पडदा संपला की परत डावीकडच्या कोपऱ्यापासून सुरू! सामान्यत: दूरदर्शनच्या पडद्यावर ४८० रेषा असतात आणि त्या सेकंदाला ६० वेळा रंगवल्या जातात.

चित्र क्र. २ मध्ये इलेक्ट्रॉनचा झोत फिरण्याचे संकल्पनाचित्र दाखविले आहे. काळ्या रंगातील रेषा पडद्यावरील आडव्या रेषा दाखवतात. लाल रंगातील रेषेत दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनचा झोत उजवीकडून डावीकडे येतो आणि पुढची रेषा रंगवतो. निळ्या रंगात दाखवलेली रेषा इलेक्ट्रॉनचा झोत पडद्याच्या खालच्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यात आल्यावर परत वरच्या डाव्या कोपऱ्यात जाऊन रेषा रंगवायला सुरुवात करतो.कृष्णधवल रंगातील विविध छटा रंगवताना त्या इलेक्ट्रॉन झोताचे विभव  नियंत्रित केले जाते. दृष्टिसातत्याच्या नियमानुसार आपला मेंदू या गतीने समोर आलेली चित्रे एकत्र करून आलेली चित्रे हलती करतो.ही सर्व यंत्रणा चालण्यासाठी जेव्हा दूरदर्शन स्थानक संकेत प्रक्षेपित करते, किंवा आपल्या घरातील श्उफ दूरदर्शन संचाला जोडला जातो तेव्हा योग्य ते दृश्य दिसण्यासाठी त्याच्याकडून येणाऱ्या संकेतांमध्ये तीन प्रकारची माहिती असते.

१. तीव्रतेची माहिती- इलेक्ट्रॉन झोतासाठी.

२. आडवा परत फिरण्याचा संकेत- प्रत्येक रेषा कुठे संपवायची, हे संचातील नियंत्रकाला कळण्यासाठी.

३.  उभा परत फिरण्याचा संकेत- सेकंदाला ६० वेळा- झोत उजव्या बाजूच्या शेवटच्या कोपऱ्यापासून परत डावीकडच्या पहिल्या कोपऱ्यात जाण्यासाठी.

हे तीन संकेत एकत्र असल्यानेच त्याला संयुक्त व्हिडीओ संकेत म्हणतात. श्उफ कडून दूरदर्शन संचात जाणाऱ्या तारांमधील पिवळी तार हे संकेत संचाकडे नेते.

कृष्णधवल संचातील उफळ मध्ये होणारे इलेक्ट्रॉन झोताचे विस्थापन दाखवले आहे, तर दाखवल्याप्रमाणे रंगीत दूरदर्शनच्या पडद्यावर संदीपकांची रचना असते. विस्थापित झालेले इलेक्ट्रॉनचे तीन झोत त्यांच्याशी संबंधित संदीपक हव्या त्या प्रमाणात उद्दीपित करून योग्य तो रंग पडद्यावर दाखवतात.

रंगीत दूरदर्शन संचाचा पडदा आणि कृष्णधवल संचाचा पडदा यांत पुढील फरक असतात.

१. कृष्णधवल संचाच्या उफळ मध्ये इलेक्ट्रॉनचा एकच झोत असतो, तर रंगीत संचात तीन झोत असतात. लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाचे स्वतंत्र झोत एकाच वेळी प्रक्षेपित होत असतात.

२. कृष्णधवल संचात फक्त पांढरा रंग फेकणारे संदीपक असतात, तर रंगीत संचात लाल, हिरवा व निळा रंग फेकणारे संदीपक असतात. आपण जर दूरदर्शनचा अथवा संगणकाचा प्रकाशित पडदा जवळून बहिर्गोल भिंगातून बघितला तर हे संदीपक ठिपक्यांच्या किंवा रेषांच्या स्वरूपात आपल्याला दिसू शकतात.

रंगीत संचाच्या पडद्याच्या अलीकडे आतल्या बाजूने एक धातूची जाळी बसवलेली असते. त्याची छिद्रे संदीपकांशी एकरेषीय असतात.

रंगीत संचामध्ये घडणाऱ्या प्रक्रियेचे संकल्पनाचित्र दाखवले आहे. रंगीत दूरदर्शनचे संकेत प्रक्षेपित होताना कृष्णधवल संकेतांप्रमाणेच प्रक्षेपित होतात. श्उफ मधील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा त्यातील ध्वनिचित्रफितीवरील दृश्य आणि श्राव्य संकेत वेगळे करून दूरदर्शन संचाकडे पाठवतो आणि संचातून आपण त्या फितीतील मुद्रण पाहू आणि ऐकू शकतो. केबलमार्फत संकेत येताना ते मुख्य ग्रहणव्यवस्थेकडून प्रमाणित करून तारेमधून आपल्या संचामध्ये पोहोचतात. या प्रसारणामध्ये आर्थिक मामला गुंतलेला असल्यामुळे इतर फुकटय़ांनी हे संकेत चोरू नयेत म्हणून त्यांना विशिष्ट सांकेतिक आकडे देऊन प्रसारित केले जातात. आपल्या घरातील केबल वितरकाने दिलेला डबा (री३ ळस्र् इ७) ते सांकेतिक आकडे वाचून परवानगी असलेले (पैसे भरलेले) संकेत संचाकडे पाठवतो.

१९२६ मध्ये सुरू झालेला हा दूरदर्शनचा प्रवास गेल्या ९० वर्षांत झपाटय़ाने आपले स्वरूप  बदलत गेला आहे. दूरदर्शन संचांच्या आकारात आणि त्यावर दिसणाऱ्या चित्रांच्या दर्जात आमूलाग्र बदल आणि सुधारणा होत गेल्या. त्यातील तांत्रिक बदलांचा आढावा घेऊया पुढच्या भागात.
dpdeodhar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 1:13 am

Web Title: television information part 2
Next Stories
1 दूरदर्शन (Television)
2 रंगीत चित्रण
3 डिजिटल चलचित्र कॅमेरा
Just Now!
X