अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे कमी किंमतीत मोबाईल मिळण्याचे चांगले पर्याय ठरत आहेत. मात्र, त्याचबरोबर दोन्ही संकेतस्थळांचे सेल ग्राहकांना अजून कमी किंमतीत फोन्स देतात, त्यामुळे ग्राहकांची बचत होते. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनचे हे सेल पुन्हा सुरू होणार आहेत. यात तुम्हाला २० हजार रुपयांपेक्षाही अधिक किंमतीचे फोन ५० टक्क्यांपर्यंतच्या सूटसह मिळणार आहेत. आज आम्ही असे काही फोन्स दाखवणार आहोत.

१) सॅमसंग ओप्पो एफ २३ ५ जी

SAMSUNG Galaxy F23 5G फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये या फोनवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक सूट मिळणार आहे. २२ हजार ९९९ ही फोनची लिस्टिंग किंमत आहे. सेलमध्ये तुम्ही हा फोन १० हजार ९९९ रुपांना घेऊ शकाल. फोनमध्ये ४ जी रॅम आणि १२८ जीबी रोम आहे जी १ टीबी पर्यंत वाढवता येते. तसेच फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

२) आयक्यूओओ झेड ६ प्रो ५ जी

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये iQOO Z6 Pro 5G या फोनवर मोठी सूट मिळणार आहे. याची घोषणा कंपनीने देखील केली आहे. iQOO Z6 Pro 5G ची लिस्टिंग किंमत २७ हजार ९९० इतकी आहे. सेलमध्ये हा फोन १७ हजार ९९० रुपयांमध्ये विकला जाईल. फोनमध्ये ६ जी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.

३) पोको एक्स ४ प्रो ५ जी

POCO X4 Pro 5G फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये खूप कमी किंमतीत मिळणार आहे. या फोनची लिस्टिंग किंमत २२ हजार ९९० इतकी आहे. सेलमध्ये हा फोन तुम्हाला केवळ १३ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे आणि स्नॅपड्रॅगन ६८५ ५जी प्रोसेसर आहे.

४) ओप्पो एफ १९ प्रो प्लस ५ जी

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये Oppo F19 Pro+ 5G वर १० हजार रुपयांची मोठी सूट मिळणार आहे. सेलमध्ये हा फोन २५ हजार ९९० एवजी १५ हजार ९९० रुपयांमध्ये घेता येईल. या फोनमध्ये ८ जीबी रॅम आहे आणि १२८ जीबीची इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि सेल्फिसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.