scorecardresearch

World Book Day: अ‍ॅमेझॉनकडून पुस्तकप्रेमींना खास भेट; पुस्तक,ई-बुक्स, किंडल ई-रिडर्सवर सवलत

जागतिक पुस्तक दिन २०२२ च्या निमित्ताने, अ‍ॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवरील पुस्तके आणि ई-बुकच्या सर्व वाचकांसाठी खास ऑफर जाहीर केल्या आहेत.

ग्राहकांना ई-बुकवर ७० टक्क्यांपर्यंत आणि इतर पुस्तकांवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. (Photo : Indian Express)

जागतिक पुस्तक दिन २०२२ च्या निमित्ताने, अ‍ॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवरील पुस्तके आणि ई-बुकच्या सर्व वाचकांसाठी खास ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर २३ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत लाइव्ह असतील आणि त्यात विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश असेल. जगभरातून मिळवलेली आणि इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेली १० किंडल बुक्सही अ‍ॅमेझॉन मोफत देत आहे. या वर्षीच्या कलेक्शनमध्ये फरहाद जे. डॅडीबुर्जोर यांचे ‘द अदर मॅन’ देखील आहे.

या ऑफर्स दरम्यान, ग्राहकांना ई-बुकवर ७० टक्क्यांपर्यंत आणि इतर प्रकारातील पुस्तकांवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. प्राइम मेंबर फक्त ९९ रुपयांमध्ये किंडल अनलिमिटेडच्या ३ महिन्यांच्या सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकतात. यामुळे त्यांना २० लाखांहून अधिक ई-बुक वाचता येणार आहेत. प्राइम रीडिंगचा एक भाग म्हणून, प्राइम सदस्यांना शेकडो लोकप्रिय ई-बुक कोणत्याही अतिरिक्त वाचता येतील.

UPI Fraud : सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी पाच सोप्या स्टेप्स; आजच करा फॉलो

ग्राहक ऑडिबलसाठी ३० दिवसांच्या मोफत ट्रायलचा देखील लाभ घेऊ शकतात जे त्यांना त्यांचे पहिले ऑडिओबुक विनामूल्य आणि प्लस कॅटलॉगमध्ये वाचण्याची परवानगी देईल. प्राइम सदस्य ३० दिवसांच्या ट्रायल सदस्यत्वादरम्यान अतिरिक्त मोफत ऑडिओबुकचा आनंद घेऊ शकतात.

अ‍ॅमेझॉन, किंडल वाचकांची संपूर्ण श्रेणी सवलतीच्या दरात देत आहे. यामध्ये किंडल पेपरव्हाइट आणि किंडल पेपरव्हाइट सिग्नेचर या आवृत्तीचा समावेश आहे. नवीनतम किंडल पेपरव्हाइट ३३० पीपीआय ग्लेअर-फ्री डिस्प्ले, अ‍ॅडजस्टेबल वॉर्म लाइटसह येते, तर किंडल पेपरव्हाइट सिग्नेचर एडिशनल स्टोरेज, ऑटो-अ‍ॅडजस्टिंग फ्रंट लाइट आणि वायरलेस चार्जिंगसह येते. ही दोन्ही उत्पादने अनुक्रमे ११,२९९ रुपये आणि १५,४९९ रुपयांना उपलब्ध असतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A special gift from amazon for book lovers discounts on books e books kindle readers pvp

ताज्या बातम्या