Wikipedia Latest Version: आपण रोजच्या जीवनात गुगलचा वापर करत असतो. एखा विषयाची माहिती आपल्याला हवी असेल तर ती आपल्याला गुगलवर मिळते. गुलवार विकिपीडियावर कोणत्याही विषयाची माहिती , इतिहास , भूगोल सर्वांची माहिती आपल्याला मिळते. तर याच विकिपिडियाने डेस्कटॉप सिरीजचा नवीन इंटरफेस लाँच केला आहे.

विकिपीडिया डेस्कटॉपचा नवीन इंटरफेस हा पूर्वीपेक्षा वाचण्यास सोपा असा तयार करण्यात आला आहे. त्या डिझाईनमध्ये एक नवीन मेनू देखील तिथे देण्यात आला आहे ज्यामुळे युजर्सना कोणतीही माहिती शोधणे अधिक सोपे होणार आहे. डेस्कटॉपवर विकिपीडिया शोधण्याची पद्धत आता पूर्णपणे बदलली आहे. विकिपीडिया ओपन केल्यावर तुम्हाला आता एक सर्च बॉक्स दिसणार आहे. बॉक्समध्ये तुम्हाला हव्या असलेल्या माहितीशी संबंधित किवर्डस टाकल्या ती माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये तुम्ही तब्बल ३०० भाषांमधील लेख , माहिती वाचू शकणार आहेत. आता नव्या डिझाइननुसार हेडरवर तुम्ही लेखाची हेडलाईन सर्च करू शकता. यात अन्य नवीन फीचर्सदेखील जोडण्यात आला आहे.

हेही वाचा : नवीन स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा विचार करताय? Samsung पासून Oppo पर्यंत जबरदस्त फिचरचे ‘हे’ फोन पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुन्या फीचर्सवर या नवीन डिझाईनचा कोणताही परिणाम होणार नाही असा दावा विकिपीडियाने केला आहे. हे नवीन डिझाईन युजर्ससाठी उपयुक्त असल्याचे विकिपीडियाचे म्हणणे आहे. विकिपीडियाचे व्यवस्थापन भारत , इंडोनेशिया , घाना आणि अर्जेंटिना येथील ३० वेगवेगळ्या स्वयंसेवकांद्वारे केले जाते.