Smart TV Offers: तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. कारण, सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर फॅब टीव्ही फेस्ट सेल सुरू आहे. हा सेल १० एप्रिलपर्यंत चालणार असून या सेलमध्ये टॉप ब्रँड्सच्या टीव्हीवर ५० टक्के इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ मिळतो. याशिवाय तुम्हाला या डील्समध्ये अनेक बँक ऑफर्सचाही लाभ मिळत आहे. चला तर पाहूया कोणत्या या स्मार्टटीव्ही…

Redmi 80 cm (32 inch)

Redmi च्या या स्मार्टटीव्हीमध्ये तुम्हाला मोठा स्क्रीन आकार म्हणजेच ३० इंच आकारमान मिळतो. या टीव्हीची मूळ किंमत २४,९९९ रुपये आहे परंतु तुम्ही Amazon वरून ५२ टक्के डिस्काउंटसह केवळ ११,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही या टीव्हीसाठी HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला त्यावर १० टक्क्यांची झटपट सूट मिळेल.

(हे ही वाचा: नवीन लॅपटॉप खरेदी करायचाय? मोबाईलच्या बजेटमधील ‘हे’ आहेत बेस्ट लॅपटॉप्स, ऑफिसच्या कामासाठी होईल उपयोग )

Westinghouse 80 cm (32 in)

या ३२-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत १७,४०० रुपये आहे, परंतु तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ४९ टक्के सूटसह ८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने या स्मार्ट टीव्हीसाठी पैसे भरल्यास, तुम्ही १० टक्के झटपट सवलत मिळवू शकता.

MI 80 cm (32 Inch) 5A Series

या ३२-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत २४,९९९ रुपये आहे परंतु तुम्ही हा स्मार्ट टीव्ही ४८ टक्के सूटसह १२,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरले तर तुम्ही १० टक्के तात्काळ सवलतीचा लाभ घेऊ शकता.

(हे ही वाचा: एकही रुपया न देता घरी न्या iPhone! ‘Buy Now Pay Later’ ऑफर आहे तरी काय? जाणून घ्या… )

Nu 109 cm (43 inch) Premium Series

या ४३-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ३९,९९९ रुपये आहे, परंतु तुम्ही Amazon वरून हा टीव्ही खरेदी केल्यास, ५० टक्के सूट देऊन तुम्ही तो १९,९९० रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही ७५० रुपयांच्या झटपट सूटचाही लाभ घेऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Kodak 98 cm (40 in)

या ४०-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत २४,९९९ रुपये आहे परंतु तुम्ही ४० टक्के सूट देऊन १४,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही १० टक्के तात्काळ सवलतीचा लाभ घेऊ शकता.