90 Thousand Dell Laptop for 17 Thousand: डेल हे लॅपटॉपच्या जगात प्रसिद्ध नाव आहे. जर तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, कारण ९०,००० रुपये किमतीचा लॅपटॉप डेलकडून १७,००० रुपयांना खरेदी करता येईल. लॅपटॉपची किरकोळ किंमत ९०,००० रुपये आहे. जे केवळ १८,५९९ रुपयांमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ऑफर करण्यात आले आहे. या लॅपटॉपच्या खरेदीवर यूजर्सना थेट ७१,४०१ रुपयांची बचत करु शकतात.

बँक ऑफर आणि डील

अॅमेझॉनकडून लॅपटॉप खरेदीवर एक उत्तम ऑफर दिली जात आहे, जेणेकरून युजर्स स्वस्तात खरेदी करू शकतील. Dell latitude e5450 या लॅपटॉपच्या खरेदीवर अनेक प्रकारच्या बँक डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. यामध्ये HDFC बँक क्रेडिट कार्डच्या खरेदीवर १,५०० रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर लॅपटॉपची किंमत फक्त १७,०९० रुपये राहते. लॅपटॉपच्या खरेदीवर ६ महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. तसेच, ७ दिवसांचे प्रोडक्ट बदलण्याची ऑफरही दिली जात आहे.

(हे ही वाचा : Smartphone Camera: स्मार्टफोनचा कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण )

Refurbished केलेला फोन

हा एक Refurbished लॅपटॉप आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही स्क्रॅच मार्क्स दिसू शकतात. Refurbished केलेले लॅपटॉप पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. पण हे लॅपटॉप वॉरंटीसह दिले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॅपटॉपची वैशिष्ट्ये

डेल लॅपटॉपचा मॉडेल क्रमांक Dell latitude e5450 आहे. या लॅपटॉपची स्क्रीन १४ इंच आहे. हा लॅपटॉप काळ्या रंगाच्या पर्यायात येतो. यामध्ये तुम्हाला २५६ जीबीची हार्ड डिस्क देण्यात आला आहे. लॅपटॉप Core i5 5300U सपोर्टसह येतो. यात २५६ GB स्टोरेज आहे. लॅपटॉप विंडोज आधारित आहे. यामध्ये इंटेल एचडी ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच लॅपटॉप अँटी ग्लेअर कोटिंगसह येतो.