विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. ६० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या अल बायत स्टेडियममध्ये इक्वेडोर विरुद्ध यजमान कतार असा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये इक्वेडोरने २-० असा विजय मिळवला. भारतामध्ये हा सामना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानींच्या मालकीच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या ‘जिओ’ सिनेमा या मोफत अ‍ॅपवरुन थेट प्रक्षेपित करण्यात आला. वेबसाईटवरही हा सामना मोफत दाखवण्यात आला. मात्र मोठ्या संख्येने हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांना या अ‍ॅप आणि वेबसाईटचा वापर केल्याने लाइव्ह स्ट्रीमींगचा दर्जा घसरल्याचं आणि अनेक तांत्रिक अडचणींचा वेगळाच सामना चाहत्यांना करावा लागाला. यासंदर्भात चाहत्यांनी सोशल मीडियावरुन थेट नाराजी व्यक्त करत रिलायन्स ‘जिओ’कडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

नक्की पाहा >> Video: कोणाचं काय तर कोणाचं काय… त्यांना बिअरचीच अधिक चिंता; FIFA World Cup च्या पहिल्या मॅचमधली घोषणाबाजी चर्चेत

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Which teams will qualify for playoffs
IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

वेगवान इंटरनेट कनेक्शन असलेल्यांनाही हे सामने लाइव्ह पाहताना अडचणी आल्याचं सोशल मीडियावरुन सांगण्यात आलं आहे. अनेक चाहत्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील नाराजी व्यक्त केली आहे. विश्वचषक पाहण्याचा सर्व उत्साह या गोंधळामुळे मावळल्याचं सांगत अनेकांनी या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘जिओ’नेही ट्वीटरवरुन या तक्रारींची दखल घेतल्याचं ट्विटरवर दिसून आलं. आमची टीम या तांत्रिक अडचणीवर काम करत असून बफरींगसंदर्भातील समस्या सोडवत आहोत असं सामना सुरु असताना पोस्ट केलं होतं.

यानंतर ‘जिओ’ने ट्विटरवरुन “प्रिय जिओसिनेमा चाहत्यांनो, तुम्हाला सामन्याचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. तुम्ही तुमचं अ‍ॅप अपडेट करुन फिफा विश्वचषक कतार २०२२ चा आनंद गेऊ शकता. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व,” अशी पोस्ट केली.

यानंतरही समस्या विरुद्ध चाहते हा सामना सुरुच होता. अ‍ॅप अपडेट केल्यानंतरही विशेष काही फरक पडला नाही असं अनेकांनी ट्विटरवरुन सांगितलं. मात्र काहींनी अपडेट केलेल्या अ‍ॅपवर सामना व्यवस्थित दिसत असल्याचं सांगितलं. अगदी रात्री उशीरापर्यंत चाहत्यांना सामना पाहण्यात अडचणी येत होत्या. अनेकांनी तर आपल्याला पहिल्या सामन्यातील एकही गोल पाहता आला नाही असं म्हटलं आहे. एकाने तर थेट सोनीला लाइव्ह स्ट्रीमींगचं कंत्राट द्यायला हवं होतं असं म्हटलं आहे. “तुमच्यापेक्षा ‘सोनी’ने लाइव्ह स्ट्रीमिंग केलं असतं तर बरं झालं असतं,” असा रिप्लाय एकाने ‘जिओ’च्या ट्वीटवर दिला.

आघाडीपटू एनर व्हेलेंसियाने झळकावलेल्या दोन गोलच्या बळावर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत इक्वेडोरने रविवारी यजमान कतारवर २-० असा विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत यजमान संघ उद्घाटनीय सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ होती.