Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. कंपनीचे अनेक प्रॉडक्ट्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. Apple ही टेक कंपनी आहे. याचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे. कंपनी आयफोन ,आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअरचे देखील उत्पादन करते.  त्यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन निर्माती असलेली अ‍ॅपल कंपनी फॉक्सकॉनच्या हैद्राबाद येथील फॅक्टरीमध्ये आपल्या वायरलेस इअरबड्स AirPods चे उत्पादन सुरू करणार आहे.

फॉक्सकॉन कंपनीने हैद्राबाद प्लांटसाठी ४०० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत मोठ्या प्रमाणावर याचे उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. ”फॉक्सकॉन हैदराबाद येथील फॅक्टरीत AirPods चे उत्पादन करेल. डिसेंबरपर्यंत फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु होण्याची अपेक्षा आहे.” असे एका सूत्राने पीटीआयला सांगितले. माहितीची पुष्टी आणखी एका स्त्रोताद्वारे केली गेली आहे जो विकासाची माहिती आहे. Apple आणि Foxconn ला पाठवलेल्या ईमेल क्वेरीला कोणतेही उत्तर मिळाले नाही.

हेही वाचा : टाटाचे टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल! भारतात तयार होणार ‘मेड इन इंडिया आयफोन’, चीनला बसणार मोठा झटका

आयफोननंतर एअरपॉड्स हे दुसरे उत्पादन सेगमेंट असेल ज्याचे उत्पादन भारतात केले जाईल. अ‍ॅपलच्या एअरपॉड्स जागतिक स्तरावर TWS (ट्रू वायरलेस स्टिरिओ ) बाजारामध्ये आघाडीवर आहेत. रिसर्च फार्म कॅनालिसच्या म्हणण्यानुसार डिसेंबर २०२२ च्या तिमाहीमध्ये सुमारे ३६ टक्के मार्केट शेअरसह जागतिक TWS बाजाराचे नेतृत्व केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅपल नंतर सॅमसंगचा मार्केट शेअर ७.५ टक्के , शाओमी ४.४ टक्के आणि बोट (Boat) ४ टक्के व ओप्पो ३ टक्के इतका आहे. शाओमीने भारतातील आपल्या नोएडा येथील प्लांटमध्ये TWS बनवण्यास सूरूवात केली.