Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. त्यामध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस आणि आयफोन १५ प्रो, आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. १८ सप्टेंबरपासून या मॉडेल्सचे प्री-बुकिंग सुरु झाले आहे. २२ सप्टेंबरपासून याच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. तसेच कंपनीने आयफोन १५ सिरीजसह वॉच सिरीज ९ पण लॉन्च केली आहे. सध्या कंपनी आयफोन्सच्या काही मॉडेल्सवर डिस्काउंट देत आहे. त्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

खरेदीदार (पहिल्यांदाच खरेदी करणारे) आता कशाप्रकारे देशात आकर्षक डिस्काउंटसह आपले आवडते डिव्हाइस खरेदी करू शकतात हे कंपनीने सांगितले आहे. ऑनलाइन स्वरूपात तसेच मुंबई व दिल्ली येथील Apple च्या रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकणार आहेत. HDFC बँकेच्या कार्डवरून व्यवहार केल्यास खरेदीदारांना आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स वर ६ हजारांचा डिस्काउंट कंपनी देत आहे. तसेच आयफोन १५ व आयफोन १५ प्लसवर ५ हजारांचा डिस्काउंट, आयफोन १४ व आयफोन १४ प्लसवर ४ हजारांचा डिस्काउंट, आयफोन १३ वर ३ हजारांचा डिस्काउंट व आयफोन SE वे २ हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : जिओ AirFiber ‘या’ शहरांमध्ये उपलब्ध; युजर्सना पाहता येणार ५५० पेक्षा जास्त डिजिटल चॅनेल्स, एकदा प्लॅन्स पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Apple कंपनी वॉच वापरणाऱ्यांसाठी काही डिस्काउंट ऑफर्स घेऊन आली आहे. HDFC बँकेच्या कार्डवरून व्यवहार केल्यास तुम्हाला वॉच अल्ट्रा २ वर ३ हजारांचा डिस्काउंट, वॉच सिरीज ९ वर २,५०० हजारांचा डिस्काउंट, वॉच SE वर १,५०० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळवू शकता. तसेच कंपनी यामध्ये तुम्हाला ३ किंवा ६ महिन्यासाठी कंपनी नो कॉस्ट ईएमआय ऑफर करत आहे. Apple कंपनी इंडिया ऑनलाइन स्टोअरमध्ये नवीन आयफोन्सची किंमत कमी करण्यासाठी ट्रेड इन व्हॅल्यू ऑफर करेल. Apple जेव्हा तुमचा नवीन iPhone वितरित करेल, तेव्हा ते ट्रेड-इन पूर्ण करेल.