सॅमसंग गॅलेक्सी स्मार्ट फोनने त्यांच्या OneUI या अँड्रॉइड व्हर्जनच्या नवीन अपडेटवर काम केलेले दिसते. अँड्रॉइड १४ OS च्या अनेक नवीन फिचर्स, क्विक सेटिंग पॅनल्स आणि यामधील अनेक दुरुस्त्या लक्षात घेता, या कंपनीने नुकतेच OneUI 6 हे नवीन अपडेट आणलेले आहे. या नवीन OneUI 6 अपडेटसह सॅमसंगने अनेक नवीन सिक्युरिटी फिचर्सदेखील आणले आहेत, ज्यामुळे सॅमसंग गॅलेक्सीचे स्मार्ट फोन्स अँड्रॉइड १४ वरदेखील अगदी सुरळीत चालतील आणि अधिक सुरक्षितसुद्धा असतील, असे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते. या सिक्युरिटी फिचरचे नाव आहे, ‘ऑटो ब्लॉकर.’

सॅमसंगच्या या ऑटोब्लॉकरमुळे OneUI 6 ची सुरक्षितता अधिक वाढते. तुमच्या फोनमध्ये काही वेगळे घडत असेल, फोन हॅक होत असेल, तर फोनला त्याबद्दल जाणीव होऊ शकते. जेव्हा ऑटो ब्लॉकरची सेटिंग चालू केली जाते, तेव्हा एखाद्या अनऑथराईज्ड सोर्सचे ॲप इन्स्टॉलेशन ब्लॉक करणे, सिक्युरिटी चेक सुरू करणे, आणि USB च्या कमांड्स बंद करणे अशा सर्व गोष्टी या ऑटो ब्लॉकरमुळे केल्या जातात, ज्यामुळे तुमच्या चार्जिंग पोर्टद्वारे किंवा कोणत्याही कोडच्या मदतीने एखाद्या चुकीच्या ॲपला फोनमध्ये येण्यापासून बचाव करण्यास मदत होते.

हेही वाचा : iqoo 12 की OnePlus 12 कॅमेरा, बॅटरी आणि इतर फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन ठरतो सर्वात बेस्ट? जाणून घ्या…

या नवीन तंत्रज्ञानाच्या सुरक्षेमुळे, मेसेजेसमध्ये एखादा मालवेअर [malware] फोटो आला असल्यास तोदेखील ताबडतोब ब्लॉक करून टाकण्यास मदत केली जाते. परंतु, ही सेटिंग फोनमध्ये काशी सुरू करायची ते पाहा.

सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनमध्ये ऑटो ब्लॉक कसे सुरू करावे.

OneUI 6 आधारित अँड्रॉइड OS १४ सॅमसंग फोनमधील ऑटो ब्लॉक सेटिंग सुरू करण्यासाठी, सर्वप्रथम सेटिंग्जमध्ये जावे.
तेथील सिक्युरिटी अँड प्रायव्हसी हा पर्याय निवडावा.
नंतर ऑटो ब्लॉकरवर क्लिक करून, टर्न ऑनवर क्लिक करावे.

संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सॅमसंग हे MacAfee तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे, त्यामुळे हे सेटिंग वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांची लायसन्स अँड प्रायव्हसी पॉलिसी एक्स्पेट करावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : इन्स्टाग्राम स्टोरीसाठी आले नवीन फिचर; ‘ॲड युअर्स’ टेम्प्लेट म्हणजे काय? ते काम कसे करते? पाहा…

ऑटो ब्लॉकर ही सेटिंग जरी फोनची सुरक्षितता वाढवत असली, तरीही त्याचे काही तोटेसुद्धा आहेत. जसे की, कोणतेही अनऑथोराइज्ड ॲप तुम्हाला साईडलोड करता येणार नाही. त्यासोबतच कॉम्प्युटरवरून तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट करता येणार नाही.