बोटने भारतात नवीन Airdopes 111 इयरबड लाँच केले आहेत जे चार रंगांच्या पर्यायांमध्ये येतात. हे इयरबड १३mm ड्राइवर्सने सुसज्ज आहेत, ज्यामध्ये ब्लूटूथ ५.१ ची कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे. कंपनीने यामध्ये विशेष IWP तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे इयरबड्स चार्जिंग केसमधून बाहेर येताच डिव्हाइसशी सहजपणे कनेक्ट होतात. कंपनीचा दावा आहे की चार्जिंग केससह २८ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप उपलब्ध आहे. टच कंट्रोल आणि फोन कॉल रिसिव्ह सारखी वैशिष्ट्ये देखील इयरबडमध्ये उपलब्ध आहेत.

किंमत किती?

Boat Airdopes 111 ची भारतात किंमत १.४९९ रुपये आहे, जी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लीप्कार्ट वर दिली आहे. अॅमेझॉनवर या इयरबड्सची किंमत १,२९९ रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. Airdops 111 चार रंगांमध्ये उपलब्ध आहे – ओशन ब्लू, सँड पर्ल, कार्बन ब्लॅक आणि स्नो व्हाइट.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
apple sent alert emails to iphone users
काही भारतीयांच्या ‘आयफोन’मध्ये स्पायवेअर असू शकतं; अ‍ॅपलची धोक्याची सूचना!
irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा
mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…

(हे ही वाचा: २५० रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात ‘हे’ पाच उत्तम Airtel चे रीचार्ज प्लॅन)

स्‍पे᠎सिफ़िकेशन

बोट एअरडोप्स 111 TWS इअरबड्समध्ये बोटच्या सिग्नेचर ट्यूनिंगसह १३ मिमी ड्रायव्हर्स आहेत. बोटच्या इअरबड्सचा बेसवर विशेष फोकस असतो. वेअरेबलमध्ये ब्लूटूथ ५.१ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये विशेष IWP (Insta Wake N’ Pair) तंत्रज्ञान वापरले आहे, जे केसमधून बाहेर काढल्यावर आपोआप इयरबड्सला डिव्हाइसशी जोडते. फोन कॉल्स रिसिव्ह करताना चांगल्या आवाजाच्या स्पष्टतेसाठी यात इनबिल्ट मायक्रोफोन देखील आहे.

(हे ही वाचा: १० हजाराहून कमी किमतीचा आणि उत्तम बॅटरी असलेला स्मार्टफोन Tecno Pop 5 Pro भारतात लाँच; जाणून घ्या तपशील)

याशिवाय या वेअरेबलमध्ये क्विक रिस्पॉन्ससाठी सपोर्ट, टच कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत, ज्यामुळे सिरी आणि गुगल असिस्टंट सारखे व्हॉईस असिस्टंट स्मार्टफोनमध्ये सहज कार्यान्वित करता येतील. यासह, संगीत आणि कॉल नियंत्रित करण्याचे फिचर देखील याद्वारे शक्य आहे.

(हे ही वाचा: रियलमीचे Realme 9 Pro आणि Plus लवकर भारतात होणार लॉंच, असेल ५G तंत्रज्ञानाने सुसज्ज)

कंपनीने या उपकरणासह २८ तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Airdops 111 ला एकदा चार्ज केल्यावर ७ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. त्याच्या चार्जिंग केसबद्दल बोलायचे तर ते इयरबड्स तीन वेळा चार्ज करू शकतात. म्हणजेच, चार्जिंग केससह, त्यांना २८ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. चार्जिंगसाठी, यात यूएसबी टाइप सी पोर्ट आहे जो लवकरात लवकर चार्जिंगला सपोर्ट करतो. या संदर्भात, कंपनीचा दावा आहे की ते फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगवर ४५ मिनिटांपर्यंत प्लेबॅक देऊ शकते.