BSNL ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल कंपनीकडे सध्या दोन लोकप्रिय ब्रॉडबँड प्लॅन्स आहेत. या प्लॅन्समध्ये BSNL ने वेबसाईटवर ‘लोकप्रिय’ म्हणून चिन्हांकित केले आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीने या प्लॅन्सची मागणी जास्त असल्याचे सांगितले कारण या प्लॅन्समध्ये कंपनी जास्त फायदे ऑफर करते. कंपनीकडे ८४९ रुपये आणि ९९९ रुपये महिना असे दोन प्लॅन्स आहेत. यामध्ये अतिरिक्त टॅक्सचा समावेश नाही. तर BSNL च्या या दोन्ही प्लॅन्सचे फायदे आपण जाणून घेऊयात.
BSNL चा ८४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
बीएसएनएलच्या ८४९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये १०० Mbps पर्यंतचा स्पीड मिळतो. तसेच ३.३ टीबी मासिक डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर हा स्पीड १० Mbps इतका कमी येतो. तसेच ग्राहकांना यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगच्या फायद्यांसह विनामूल्य फिक्स्ड-लाइन व्हॉइस कॉलिंग कनेक्शन देखील मिळते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : चिमणी उडाली भुर्रर्र, Elon Musk यांनी बदलला ट्विटरचा लोगो; नवा लोगो पाहिलात का?
मात्र या प्लॅनमध्ये लँडलाईन इन्स्ट्रुमेंट हे वापरकर्त्याला स्वतःलाच खरेदी करावे लागेल. हे सर्व तुम्हाला प्लॅनसह मिळते. बीएसएनएलचा १०० Mbps चा प्लॅन जिओ आणि एअरटेलच्या ऑफरच्या तुलनेत खूप महाग आहे. OTT ७९९ रुपयांमध्ये महिना एस स्वस्त असा १०० Mbps चा प्लॅन आहे. मात्र तो ३.३ टीबीसह नाही तर १ टीबीसह येतो.
BSNL चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
बीएसएनएलच्या ९९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये २ टीबी पर्यंत मासिक डेटा आणि १५० Mbps इंटरनेट स्पीड मिळतो. डेटा लिमिटच्या पलीकडे ग्राहकांसाठी इंटरनेटचा स्पीड हा १० Mbps पर्यंत कमी होतो. वापरकर्त्यांना यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. मात्र या प्लॅनमध्ये देखील त्यांना लँडलाइन इन्स्ट्रुमेंट स्वतंत्रपणे खरेदी करावे लागेल.
या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिस्नी + हॉटस्टार, Lionsgate, , शेमारूमी, हंगामा प्ले, सोनीलिव्ह प्रीमियम, ZEE5 प्रीमियम आणि युप टीव्ही सारखे फायदे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिले जातात. यामुळे हा प्लॅन अधिक उल्लेखनीय आणि लोकप्रिय होतो.