प्रत्येक टेलिकॉम कंपनीने रिचार्ज प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. अशात सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ज्याच्यावर सर्वात जास्त ऑफर्स असतील अशा प्लॅन्सच्या शोधात असतो. आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांचे एका महिन्याचे अनेक रिचार्ज प्लॅन्स केवळ २८ दिवसांसाठी उपलब्ध आहेत. फक्त २८ दिवसांसाठी उपलब्ध असणारे हे प्लॅन मंथली प्लॅन म्हणून ऑफर करण्यात येतात. यावरून या कंपनीच्या ग्राहकांनी ट्राय (TRAI) म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तक्रार दाखल केली आणि यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ट्रायने वोडाफोन, आयडिया, बीएसएनएल आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांना ३० दिवसांसाठीचे प्लॅन लाँच करण्यास सांगितले.

ट्रायच्या आदेशानुसार कंपन्यांकडून ३० दिवसांसाठीचे रिचार्ज प्लॅन लाँच करण्यात आले. यापैकी बीएसएनएलचा सर्वात स्वस्त आणि ३० दिवसांसाठी उपलब्ध असणारा रिचार्ज प्लॅन कोणता आहे जाणून घ्या.

आणखी वाचा : ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या

बीएसएनएलचा ७५ रुपयांचा प्लॅन

  • बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत ७५ रुपये आहे, जो ३० दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • या प्लॅनमध्ये २०० मिनिटांचा कॉलिंग अवधी उपलब्ध होतो.
  • याद्वारे नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही कॉल करता येतात.
  • या प्लॅनवर ३० दिवसांसाठी २ जीबी डेटा दिला जातो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर युजर्स ४० kbps स्पीडचा डेटा वापरू शकतात.