सध्या सर्वत्र ऑनलाईन फेस्टिव्ह सीजन सेलची चर्चा सुरू आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ही त्यामधील सर्वात लोकप्रिय इ कॉमर्स कंपन्या आहेत. यांसह काही इतर कंपन्यांनीही सेलच्या या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. परंतु ग्राहकांची सर्वात जास्त पसंती फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरील या सेलच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. यामध्ये अनेक प्रोडक्ट वर ७० ते ८० टक्के सूट आहे. ही ऑफर वाचून तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडला असेल की या कंपन्यांना इतकी मोठी सूट देणे कसे परवडते?
अमेझॉनकडून इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर ७५ टक्के तर फ्लिपकार्टकडून ८० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. हा डिस्काउंट कसा दिला जातो आणि कंपनीला यातून नफा मिळतो का? नफा कामावण्याचे कंपनीचे नेमके गुपित काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. याबद्दल जाणून घेऊया.
आणखी वाचा : जिओ, वोडाफोन व एअरटेलचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते आहेत? पाहा यादी
तोट्यापासून सुरुवात
ऑनलाइन प्लॅटफॉर्म आज भरपुर नफा कमवत आहेत, परंतु त्यांची सुरुवात तोट्याने झाली होती. सुरुवातीला ऑनलाइन खरेदीचे आमिष दाखवून त्यांना ऑनलाईन खरेदीची ग्राहकांना सवय लावायची होती. त्यामुळे या कंपन्यांनी सुरूवातीला तोटा सहन केला आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. काही वर्षांपुर्वी बहुतेक जण ऑनलाइन खरेदी करणे टाळत असत, परंतु आज वेळ अशी आहे की सर्वत्र ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले जाते.
विक्री वाढवण्यासाठी नफा कमी केला जातो
नफा कमवण्याचे दोन मार्ग आहेत, पहिला म्हणजे तुम्ही महागड्या किंमतीत वस्तू विकुन कमी ग्राहक आल्यावरही नफा मिळवणे आणि दुसरा मार्ग म्हणजे प्रति ग्राहक मिळणारा नफा कमी करून वस्तू स्वस्तात विकणे. पहिल्या मार्गाने नफा कमावण्यासाठी एका मर्यादेपेक्षा एखादी वस्तु जास्त महाग विकण्यात अडचण जाणवते. परंतु दुसऱ्या मार्गाने दर कमी करून, तुम्ही मोठ्या संख्येने ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता.
OTT Free Subscription : असे मिळवा नेटफ्लिक्स व अॅमेझॉन प्राईमचे मोफत सबस्क्रीप्शन
सेलच्या दिवसांमध्ये इ कॉमर्स कंपन्यांकडुन दुसरा पर्याय वापरला जातो. भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, ज्याची सुरुवात होण्याआधी हे सेल सुरू होतात. या सेलच्या कालावधीत कंपन्यांचा पूर्ण भर जास्तीत जास्त विक्री करण्यावर असतो. दरम्यान सूट देऊन नफा कमी केला जातो. पण एकूणच बघितले तर ही विक्री इतकी मोठी आहे की या दिवसात वर्षभराची कमाई होते. ग्राहकांना सवलत देण्यात प्लॅटफॉर्म आणि विक्रेते दोन्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. विक्रीदरम्यान व्हॉल्यूम वाढवण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यांचे कमिशन कमी करतात, तर विक्रेते त्यांच्या वापरलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी सूट देतात. पण ही सवलत मर्यादित संख्येत उपलब्ध आहे.