scorecardresearch

जाणून घ्या, बीएसएनएलचा धमाकेदार वर्क फ्रॉम होम प्लॅन! दररोज मिळवा ५ जिबी डेटा, अमर्यादित कॉलिंग

सध्याची परिस्थिती पाहता कंपनीने पुन्हा वर्क फ्रॉम होम हा प्लान ग्राहकांसाठी सादर केला आहे.

बीएसएनएलने हा प्लॅन २ वर्षांपूर्वी लॉन्च केला होता. (photo: file photo)

कोरोना व्हायरसमुळे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले घरातून काम, (Omicron) ओमायक्रॉनमुळे अजूनही घरातून काम सुरू आहे. वर्क फ्रॉम होम डेटा प्लॅन, जसे नावच सूचित करते की, ही योजना अशा लोकांसाठी आहे जे घरून ऑफिसचे काम करत आहेत. बीएसएनएलने हा प्लॅन २ वर्षांपूर्वी लॉन्च केला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता कंपनीने पुन्हा हा प्लान ग्राहकांसाठी सादर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या धमाकेदार योजनेबद्दल.

बीएसएनएल वर्क फ्रॉम होम STV ५९९ रूपयांचा प्लॅन

कंपनीचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) अमर्यादित कॉलसह राष्ट्रीय रोमिंग ऑफर करते, ज्यात दिल्ली आणि मुंबईच्या MTNL रोमिंग क्षेत्रांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा मिळतो, ज्यामध्ये दररोज ५ जिबी डेटा देण्यात येतो, एकदा तुम्ही दिवसभरात ५ जिबी डेटा वापरल्यानंतर तुमचा स्पीड ८० Kbps होईल. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये, MTNL नेटवर्कसह कोणत्याही नेटवर्कवर दररोज १०० विनामूल्य एसएमएस प्रदान करते. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. तुम्ही हे स्पेशल टॅरिफ व्हाउचर CTOPUP, BSNL वेबसाइट किंवा सेल्फ-केअर अ‍ॅक्टिव्हेशनद्वारे सक्रिय करू शकतात.

बीएसएनएलचा वर्क फ्रॉम होम २५१ रूपयांचा प्लॅन

BSNL आणखी एक वर्क फ्रॉम होम प्लॅन ऑफर करते, ज्याची किंमत २५१ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ७० जिबी डेटा मिळतो. हा प्लॅन फक्त डेटा स्पेसिफिक आहे आणि जर तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला कॉलिंग स्वतंत्रपणे रिचार्ज करावे लागेल. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे.

बीएसएनएलचा आणखी एक वर्क फ्रॉम होमचा १५१ रुपयांचा प्लॅन

BSNL आपल्या ग्राहकांना आणखी एक वर्क फ्रॉम होम प्लॅन ऑफर करते, ज्याची किंमत १५१ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ४० जिबी डेटा देण्यात येत आहे, तसेच या प्लॅनची वैधता देखील ३० दिवसांची आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bsnl work from home plan offer 5gb data daily till 84 days validity get free call best recharge scsm