तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याचे कारण म्हणजे एक दमदार स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाला असून स्मार्टफोनची किंमत जास्त असल्याने त्यावर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तो स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीत मिळेल. आम्ही ‘Vivo Y02’ स्मार्टफोन बद्दल बोलत आहोत. तुम्हाला या फोनवर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत आणि तुम्हाला हा फोन स्वस्तात कसा खरेदी करता येईल, याविषयी सांगणार आहोत.
Vivo Y02 (32GB+3GB RAM) Flipkart वरून ऑर्डर करावी लागेल. या फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे आणि तुम्ही ३४ टक्के डिस्काउंटनंतर ८,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर स्वतंत्र बँक ऑफर्सही मिळत आहेत. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला १,२५० रुपयांची सूट मिळू शकते, परंतु यासाठी तुम्हाला १५,००० रुपयांची खरेदी करावी लागेल.
(हे ही वाचा : घाई करा! ‘या’ प्लॅटफॉर्मवर iPhone 13 केवळ २१,३९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर? )
आता आम्ही तुम्हाला अशी डिस्काउंट ऑफर सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्हाला हा फोन मोठ्या डिस्काउंटसह मिळेल. तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास तुम्हाला ७,९५० रुपयांची सूट मिळू शकते. पण यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असावी आणि ते जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून असते.
कंपनीच्या या एंट्री लेव्हल फोन Vivo Y02 ला आकर्षक युनिबॉडी डिझाइन देण्यात आले आहे. या फोनमध्ये मोठ्या आकाराचा डिस्प्ले आणि शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला आहे, वीवोच्या या नवीनतम फोनमध्ये ३जीबी रॅम आणि ३२जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज क्षमता १टीबीपर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत फोनमध्ये ड्युअल सिम आणि ४जी नेटवर्कचा समावेश करण्यात आला आहे.