गेल्या वर्षी OpenAI ने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. ओपनएआयद्वारे ChatGPT आता App च्या स्वरूपात उपलब्ध आहे. App लॉन्च करण्यात आले तेव्हा ते फक्त अमेरिकेतील आयफोन वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध देण्यात आले होते. chatgpt चे अ‍ॅपचा विस्तार आता ११ अतिरिक्त देशांमध्ये करण्यात आला आहे.  iOS नंतर लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांना देखील या अ‍ॅपमध्ये प्रवेश मिळणार आहे.

OpenAI च्या २६ मे च्या घोषणेनुसार ChatGPT चे App आता अमेरिका, इंग्लंड, भारत, अल्बेनिया, क्रोएशिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, जमैका, कोरिया, न्यूझीलंड.तसेच निकाराग्वा, नायजेरिया, अल्जेरिया, अर्जेंटिना, अझरबैजान, बोलिव्हिया, ब्राझील, कॅनडा, चिली, कोस्टा रिका, इक्वेडोर, एस्टोनिया, घाना, इराक, इस्रायल, जपान, जॉर्डन, कझाकस्तान, कुवेत, लेबनॉन, लिथुआनिया, मॉरिटानिया, मॉरिशस, मेक्सिको, मोरोक्को, नामिबिया, नौरू, ओमान, पाकिस्तान, पेरू, पोलंड, कतार, स्लोव्हेनिया, ट्युनिशिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…

हेही वाचा : खुशखबर! आता फोनवर करता येणार ChatGpt चा वापर, ‘या’ युजर्ससाठी लॉन्च झाले अ‍ॅप

मात्र वापरकर्त्यांना हे केवळ chrome किंवा Safari सारख्याच ब्राऊझरवरूनच वापरता येत होते. आता आयफोन वापरकर्ते Apple App स्टोअरद्वारे देखील Chatgpt App डाउनलोड करू शकतात. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी जेव्हा हे रोलआऊट होईल तेव्हा ते देखील गुगल प्ले द्वारे डाउनलोड करण्यास सक्षम असणार आहेत. आयफोनवर जर का ChatGpt App वापरायचे असेल तर वापरकर्त्यांकडे आयफोनची iOS 16.1 व त्यावरील सिरीज असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Reliance Jio ने फॅमिलीसाठी लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त प्लॅन; ३० दिवसांच्या ट्रायलसह मिळणार…

OpenAI ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले, ” आम्ही अमेरिकेमध्ये chatgpt App रोलआऊट करत आहोत आणि येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अन्य देशांमध्ये याचा विस्तार करू. वापरकर्ते App चा वापर कसे करतात हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही ChatGPT मध्ये सारखे फिचर आणि सुरक्षितता यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आयओएससाठी ChatGpt App सह आम्ही अत्याधुनिक संशोधनाला उपयुक्त साधनांमध्ये रूपांतरित करून आमच्या ध्येयाकडे आणखी एक पाऊल पुढे टाकत आहोत. ”