भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने ‘अनबॉक्स अँड डिस्कव्हर’ येथे अल्ट्रा-प्रीमियम एलईडी टीव्ही निओ QLED 8K, निओ QLED 4K आणि ओएलईडी टीव्ही लाँच केला आहे.. हे टीव्ही AI (एआय) फीचर्ससह परिपूर्ण असणार आहे. बंगळुरूमधील सॅमसंग ऑपेरा हाऊसमधील खास कार्यक्रमात कंपनीने या नवीन पर्वाची घोषणा केली आहे. चला तर पाहूयात, या टीव्हीमध्ये काय असणार खास.

फीचर्स –

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

सॅमसंग निईओ क्यूएलडी ८ के टीव्ही मध्ये NQ8 AI Gen 3 प्रोसेसर आहे. तर दुसरीकडे, निईओ क्यूएलडी ४के टीव्ही आणि ओएलईडी टीव्हीमध्ये NQ4 AI Gen 2 चिप दिला आहे. नवीन AI टीव्ही वैयक्तिक आणि तंत्रज्ञानाची उत्तम जोड आहे. कारण हे वापरकर्त्यांना घराची स्थिती, कॅमेरा Feeds, ऊर्जेचा वापर, हवामानाचा अंदाज आणि बरेच काही सहजपणे निरीक्षण करण्यास अनुमती देतात. AI टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सेट-टॉप बॉक्स लावण्याची आवश्यकता नाही, कारण टीव्ही क्लाउडद्वारे कन्टेन्टचे थेट प्रसारण करेल.

सॅमसंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग निईओ क्यूएलडी ८ के ६५ इंच, ७५ इंच आणि ८५ इंच स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध असेल. तर शिवायनिईओ क्यूएलडी ४के टीव्हीमध्ये ५५ इंच, ६५ इंच, ७५ इंच, ८५ इंच आणि ९८ इंच डिस्प्ले साइजमध्ये मिळेल. तसेच, ओएलईडी टीव्हीला ५५ इंच, ६५ इंच, ७७ इंच आणि ८३ इंच साइजमध्येदेखील उपलब्ध आहे.

हेही वाचा…फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच

ऑफर –

प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ऑफरचा एक भाग म्हणून निईओ क्यूएलडी ८ के (Neo QLED 8K), निईओ क्यूएलडी ४ के (Neo QLED 4K) आणि ग्लेअर-फ्री ओएलईडी रेंज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ७९,९९० पर्यंतचा मोफत साउंडबार; ५९,९९० किमतीचा फ्रीस्टाइल, तर २९,९९० किमतीचा म्युझिक फ्रेम, मॉडेलवर फ्री दिला जाईल. तर ३० एप्रिल २०२४ पर्यंत कंपनी ग्राहकांना काही मॉडेलवर २० टक्के कॅशबॅकदेखील देऊ शकते. तसेच सॅमसंग टीव्‍ही प्‍लस ग्राहकांना मोफत १०० हून अधिक चॅनेल्‍स प्रदान करते ; जेथे तुमच्यासाठी बातम्‍या, चित्रपट, मनोरंजन असे विविध चॅनेल्‍स त्‍वरित उपलब्‍ध होतात.

किंमत –

सॅमसंग निओ क्‍यूएलईडी ८के रेंजची किंमत ३,१९,९९० रुपयांपासून सुरू होते, तर निओ क्‍यूएलईडी ४के रेंजची किंमत १,३९,९९० रुपयांपासून तर सॅमसंगच्‍या ओएलईडी श्रेणीची किंमत १,६४,९९० रुपयांपासून सुरू होत आहे.