ChatGpt हे OpenAI ने विकसित केलेला chatbot आहे. हे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाले आहे. ओपनएआयच्या या चॅटबॉटने जगातील अनेक अवघड परीक्षा पार केल्या आहेत. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.

ChatGPT मुळे येणाऱ्या काळात हे साधन अधिक विकसित झाल्यावर लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात असे अनेकांना वाटत आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ChatGPT ला २०२२ च्या UPSC प्रिलिम्स पेपर १ (सेट A) मधून १०० प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा ChatGPT ने फक्त ५४ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात Foxconn करणार मोठी गुंतवणूक; १ लाख नोकऱ्यांची होणार निर्मिती

विशेष बाब म्हणजे Analytics इंडिया मॅगझिनने ChatGPT ला विचारले की ‘ChatGPT हा UPSC परीक्षा पास करू शकतो का? यावर ChatGPT ने उत्तर दिले की AI भाषेचे मॉडेल असल्यामुळे माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे. परंतु UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ज्ञानासोबतच माझ्याकडे क्रिटिकल थिंकिंग, अ‍ॅप्लिकेशन क्षमता आणि वेळ व्यवस्थापन कौशल्ये असणे आवश्यक आहे. मी माझ्या क्षमतेनुसार तुम्हाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ChatGPT ला विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये भूगोल, अर्थव्यवस्था, ऐतिहासिक, पर्यावरणशास्त्र, सामान्य विज्ञान ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि सामाजिक विकास आणि राज्यशास्त्र यासारख्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.चॅटजीपीटीने अर्थव्यवस्था आणि भूगोलावरील प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याचे अहवालात समोर आले आहे. इतिहासाशी संबंधित सोप्या प्रश्नांची उत्तरे देखील ChatGPT देऊ शकले नाही.