तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स हरवला असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेऱ्या मारण्याचीही गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या सहज दुसरा म्हणजेच डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. घरबसल्या सहजपणे हे काम आता तुम्हाला करता येईल.

ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास सर्वात आधी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करावी लागेल. ज्यावेळी डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय कराल, त्यावेळी एफआयआर कॉपीची गरज लागेल. पण जर ड्रायव्हिंग लायसन्स अतिशय जुनं झालं असेल, फाटलं असेल, तर ओरिजनल ड्रायव्हिंग लायसन्स कॉपी द्यावी लागेल.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या

आणखी वाचा : आता स्मार्टफोनवरून ओळखा बनावट पॅन कार्ड; ‘या’ सोप्या पद्धतीने लगेच तपासा!

कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स गमावल्यानंतर तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. तुम्ही तुमचा डुप्लिकेट परवाना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज केल्यावर मिळवू शकता. जाणून घेऊया डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत…

ऑनलाइन प्रक्रिया

  • सर्वप्रथम परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जा.
  • आता विनंती केलेले तपशील येथे भरा.
  • यानंतर, एलएलडी फॉर्म भरा. त्याची प्रिंट काढा.
  • यासोबत तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
  • आता हा फॉर्म आणि सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करा.

ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांनंतर डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे येईल.

ऑफलाइन प्रक्रिया
ज्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामधून तुम्हाला मूळ ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे, तिथे आधी जा. येथे तुम्ही एलएलडी फॉर्म भरा आणि सबमिट करा. या पूर्ण प्रक्रियेनंतर, तुम्हाला डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे ३० दिवसांत मिळेल.