कोणत्याही कारणास्तव एखाद्या व्यक्तीला त्याचे गुगल अकाउंट डिलीट करायचे असल्यास काय बरं करावं हा प्रश्न पडलेला असतो. मग तुम्ही नवीन फोन घेतला असेल म्हणून आधीचे अकाउंट नकोय किंवा विनाकारण उघडलेले अकाउंट डिलीट करायचं असल्यास ते करणं फार सोपं आहे. परंतु, अकाउंट डिलीट करण्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ते कोणते ते पाहा.

अकाउंट डिलीट करण्याचे तोटे

एखादे गुगल अकाउंट कायमस्वरूपी डिलीट केल्यास, त्यासोबत तुमचे सर्व फोटो, इमेल्स, फाईल्स, कॅलेंडर यासोबतच आतापर्यंतचा सर्व डाटादेखील डिलीट होतो. जी-मेल, ड्राइव्ह, प्ले यांसारख्या सर्व सेवांचा तुम्ही उपयोग करू शकणार नाहीत. त्यासोबतच गुगलवर खरेदी केलेल्या गोष्टी जसे की सिनेमा, संगीत, ॲप, गेम्स आणि टीव्ही कार्यक्रम या सर्व गोष्टीसुद्धा डिलीट होऊन जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिव्ह्यू आणि डाऊनलोड

एखादे अकाउंट डिलीट करण्यापूर्वी तुम्ही तुमचा सर्व डाटा एकदा तपासून आवश्यक वाटणारा डाटा डाऊनलोड करून घेऊ शकता. जर तुमचे जी-मेल अकाउंट ऑनलाइन बँकिंग, सोशल मीडिया आणि कोणत्याही ॲप्ससोबत लिंक्ड असल्यास, तुमच्या अकाउंटमधील रिकव्हरी ई-मेलची माहिती भरून घ्यावी.

हेही वाचा : सिमकार्ड खरेदी-विक्रीमध्ये होणार मोठे बदल; कोणते नियम बदलणार आणि केव्हापासून लागू होणार? जाणून घ्या…

अकाउंट डिलीट करणे

  • गुगल अकाउंटमधील डाटा आणि प्रायव्हसी या सेक्शनपाशी यावे.
  • तेथे सर्वात खाली ‘युअर डाटा अँड प्रायव्हसी’ हा पर्याय असेल, तो निवडावा.
  • तिथे गेल्यानंतर ‘मोर’ पर्याय क्लिक करून ‘डिलीट युअर गुगल अकाउंट’ हा पर्याय निवडावा.
  • त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करून आपले गुगल अकाउंट डिलीट करावे.
  • एक गुगल अकाउंट डिलीट केल्याने त्याचा परिणाम इतर कोणत्याही अकाउंटवर होणार नाही हे लक्षात असूद्या..