ई-मेलसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आणि सर्वांची पसंती असणाऱ्या Gmail मध्ये अनेक AI आधारित फीचर्स सध्या उपलब्ध आहेत. त्यामधील ईमेल लिहिण्यातही मदत करणारे, ‘help me write’ या फीचरमध्ये आता एआयमुळे आपल्याला जी मदत होते, त्यामध्ये Gmail अजून एका उपयुक्त गोष्टीची भर घालणार आहे. ही उपयुक्त गोष्ट म्हणजे केवळ तोंडाने बोलून, आपल्या आवाजावर ई-मेल लिहिणे, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखाद्वारे मिळाली आहे.

‘जीमेल वापरकर्त्याला आपल्या आवाजाच्या मदतीने, बोलून ई-मेल लिहिण्यासाठी मदत करू शकणाऱ्या एका फीचरची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती द एसपी अॅण्ड्रॉइडच्या [TheSpAndroid] एका ब्लॉग/लेखावरून मिळते आहे. एका टिंकेरर [मशीनमधील पार्ट ठीक करण्यात आणि त्यासोबत प्रयोग करण्यात रस ठेवणारी व्यक्ती] म्हणण्यानुसार, त्याने जीमेलवर एका फ्लॅगला ट्रिगर करून, हे फीचर अॅक्टिव्हेट केले. आता कोणत्याही ईमेलला उत्तर देताना किंवा ई-मेल लिहिताना स्क्रीनवर मोठ्या माइकच्या चिन्हासह ‘Draft email with voice’ हा पर्याय येतो.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
Amazon Gudi Padwa Sale 2024 going to offer deals and more on online shopping sites Read Everything About Offers
गुढीपाडव्यानिमित्त ॲमेझॉनचा बंपर सेल सुरू; साडी, दागिने अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट, तुम्ही कधी करताय खरेदी?
voice commands with Gemini AI to finding a specific EV charging station 10 hidden Google Maps features You Know
आता प्रवास होईल अधिक सोपा; Google Maps च्या ‘या’ १० फीचर्सबद्दल जाणून घ्या…
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन

हेही वाचा : फ्लिपकार्टवरून मागवला आयफोन, मात्र ग्राहकासोबत झाला Scam; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

त्या माइकवर क्लिक केल्यानंतर, व्यक्ती जे बोलते, ते लिहिले जाते आणि जेव्हा त्याचे लिहून होईल तेव्हा त्याच माइकवर पुन्हा क्लिक केल्याने लिखाण बंद होईल. त्यानंतर ‘create’ या बटनावर क्लिक करून, रेकॉर्ड केलेल्या मजकुराचा AI च्या मदतीने ईमेल ड्राफ्ट केला जातो. हा ई-मेल पाठवण्याआधी वापरकर्ता त्याला हवा तसा बदल त्यामध्ये करू शकतो. तुम्हाला एखादा लांबलचक ई-मेल पाठवायचा असेल; मात्र लिहायचा कंटाळा आला असेल तेव्हा हे फीचर खूपच उपयुक्त ठरू शकते.

तुम्हाला हे फीचर गूगल की-बोर्डमध्ये सध्या असणाऱ्या ‘स्पीक टू टाईप’ या फीचरसारखे वाटत असेल; पण येणारे हे फीचर विशेष जनरेटिव्ह AI चा वापर करून, जीमेलसह एकत्रित करण्याता आले असल्याने या फीचरचा वापर अनेक वापरकर्त्यांकडून केला जाऊ शकतो. त्यासह गूगलने स्ट्रिंगसंबंधी काही फीचर्स मागील वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये जोडली होती; मात्र वापरकर्त्यांना त्यांचा वापर कधीपासून करता येईल हे अद्याप समजलेले नाही, असे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.