Twitter Layoffs: Twiiter चा पदभार एलॉन मस्क यांनी स्वीकारल्यापासून ट्विटरमध्ये सातत्याने काही बदल केले जात आहेत. यामध्ये ब्ल्यू टिक संदर्भातील बदल किंवा मस्क यांनी स्वतःचे अकाउंट पर्सनल केले , ट्विटरच्या नव्या सीईओची घोषणा आणि महत्वाचे म्हणजे अनेक कमर्चाऱ्यांची कपात असे अनेक बदल ट्विटरमध्ये केले जात आहेत. या आधीही ट्विटरमध्ये अनेकवेळा कमर्चाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार ट्विटरने शनिवारी पुन्हा एकदा डझनभर कमर्चाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

ट्विटरने शनिवारी रात्री आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के किंवा सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही आधीच ७,५०० वरून २,००० पर्यंत कमी करण्यात आली आहे. द न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, या प्रकरणाशी परिचित असलेल्या सुमारे तीन लोकांनी पुष्टी केली आहे की ट्विटरमध्ये १० टक्क्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. मागील आठवड्यात द इन्फॉर्मेशनच्या दुसर्‍या अहवालात असा दावा करण्यात आला होता की ट्विटरने मार्केटिंग अँड सेल्स टीममधून ५० लोकांना काढून टाकले आहे.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

हेही वाचा : Tech Layoffs: Google ची नोकरी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याने मांडली व्यथा; म्हणाली, “माझ्या ६ वर्षाच्या मुलीला…”

प्लॅटफॉर्मरच्या झो शिफरच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या ट्विटर ब्लू व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शनवर कंट्रोल ठेवणारे ट्विटर पेमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्थर क्रॉफर्ड या एलॉन मस्क यांचे निष्ठावंत समजले जातात. मात्र ते सुद्धा या नोकर कपातीच्या निर्णयामधून वाचलेले नाहीत. द व्हर्जच्या अ‍ॅलेक्स हिथने देखील याची पुष्टी केली आहे की, या आठवड्याच्या शेवटी क्रॉफर्ड आणि उर्वरित प्रॉडक्शन टीमला काढून टाकण्यात आले होते.

रिपोर्टनुसार ट्विटर या सोशल मीडिया कंपनीमध्ये गेल्या महिन्यात सुमारे ८०० सेल्स आणि मार्केटिंग कंपनीचे कर्मचारी काम करत होते. नोव्हेंबर महिन्यात एलॉन मस्क यांनी ३,७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर ट्विटरमध्ये कर्मचारी कपातीला सुरुवात झाली. एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतरची हि पहिलीच टाळेबंदी होती.