दक्षिण कोरियाची कंपनी Samsung Galaxy M मालिकेतील नवीन मिड-रेंज 5G फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Samsung Galaxy M54 5G हा स्मार्टफोन २०२३ मध्ये भारतीय बाजारपेठेत पदार्पण करण्याची शक्यता आहे. सॅमसंगने अद्याप लॉन्चची माहिती दिलेली नाही, परंतु Galaxy M54 5G ची वैशिष्ट्ये आणि किंमत “द पिक्सेल” नावाच्या व्हिएतनामी YouTube चॅनेलद्वारे लीक केली गेली आहे. Galaxy M54 च्या तपशीलांबद्दल जाणून घेऊया…

Galaxy M54 5G ची वैशिष्ट्ये

Galaxy M54 5G चे तपशील आणि रेंडर द पिक्सेल नावाच्या YouTube चॅनलद्वारे शेअर केले गेले आहेत. शेअर व्हिडीओमध्ये फोनचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, Galaxy M54 5G चा Qualcomm Snapdragon ८८८ प्रोसेसर दिला जाऊ शकतो. क्वालकॉमचा हा फ्लॅगशिप प्रोसेसर गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Galaxy S21 सीरिजमध्ये वापरण्यात आला होता. तथापि, दक्षिण कोरियाची कंपनी या वर्षी लॉन्च केलेल्या Galaxy M53 5G च्या तुलनेत आगामी Galaxy M54 चा कॅमेरा डाउनग्रेड करू शकते.

आणखी वाचा : Moto E22s स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स…

Galaxy M54 5G कॅमेरा

लीक झालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy M54 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या फोनचा प्राथमिक म्हणजेच मुख्य कॅमेरा ६४ एमपी असेल. याशिवाय फोनमध्ये ८ एमपी वाइड अँगल आणि ५ एमपी मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ३२ एमपी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Galaxy M54 5G किंमत

सॅमसंगचा आगामी फोन ६०००mAh बॅटरीसह येऊ शकतो. हे २५W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी/२५६ जीबीअंतर्गत स्टोरेज क्षमता दिली जाऊ शकते. त्याची किंमत भारताता ३०,००० पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.