Flipkart Big Billion Days Sale 2024 : सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांकडून नवनवीन वस्तूंची खरेदी केली जात असते. त्यामुळे कोणत्या सणाला, कोणत्या वस्तूंची खरेदी करायची याबद्दल घरोघरी चर्चा सुरू असते. पण, ही वस्तू कुठून खरेदी करायची, दुकानातून की ऑनलाइन याबद्दल अनेकदा गोंधळ होतो. पण, जिथे सूट वा सवलत मिळणार असेल, तेथून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल सगळ्यात जास्त असतो. ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन बहुधा फ्लिपकार्टने त्यांच्या बिग बिलियन डेज सेलची (Big Billion Days Sale) घोषणा यंदा लवकर केली आहे. तसेच या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी उपकरणे, कपडे आदी गोष्टींवर सवलत मिळणार आहे.

ई-कॉमर्स साइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हा सेल ३० सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना २९ सप्टेंबरपासून या सेलमध्ये प्रवेश मिळणार आहे. या वार्षिक सेल इव्हेंटमध्ये मोठ्या सवलती देण्यात आल्या आहेत.

iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max
iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max: आयफोन १६ साठी खर्च करणे किती फायद्याचे? पाहा ‘हे’ चार फीचर्स
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
GPT next AI model 100 times more powerful than GPT 4
AI model: चॅट जीपीटीचं नवीन व्हर्जन? १०० पट पॉवरफूल असणार ‘हे’ मॉडेल; युजर्सना कसा होणार फायदा?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

नक्की या सेलमध्ये काय असणार आहे ते चला आपण जाणून घेऊ…

इलेक्ट्रॉनिक्स व ॲक्सेसरीज : सेलदरम्यान इलेक्ट्रॉनिक्स व ॲक्सेसरीजवर ५० ते ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

स्मार्ट टीव्ही व घरगुती उपकरणे : स्मार्ट टीव्ही व घरगुती उपकरणांवर ८० टक्क्यांपर्यंत सूट; तर फ्रीज, 4K स्मार्ट टीव्ही यांसारख्या निवडक वस्तूंवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

स्मार्टफोन : नथिंग (Nothing), रिअलमी (Realme), एमआय (Mi), इन्फिनिक्स (Infinix) आदी लोकप्रिय ब्रॅण्डवर ग्राहकांना प्रचंड सूट, बँक सवलती मिळणार आहेत.

हेही वाचा…iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max: आयफोन १६ साठी खर्च करणे किती फायद्याचे? पाहा ‘हे’ चार फीचर्स

अतिरिक्त फायदे : खरेदीदार त्यांची बचत वाढविण्यासाठी विशेष बँक ऑफर, एक्स्चेंज डील, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय, कॅशबॅक, कूपन अशा सवलतींचा लाभ घेऊ शकतात.

‘बिग बिलियन डेज सेल’ची (Big Billion Days Sale) तयारी कशी करावी?

या सेलचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी करावयाच्या आवश्यक बाबी खालीलप्रमाणे :

ॲक्टिव्ह फ्लिपकार्ट प्लस मेंबरशिप : फ्लिपकार्ट प्लस मेंबरशिप ॲक्टिव्ह केल्यावर तुम्हाला या सेलमध्ये लवकर प्रवेश मिळेल.

विश लिस्ट तयार करा : तुमच्या खरेदीची योजना तयार करा. त्यामुळे ‘सेल लाइव्ह’ सुरू झाल्यावर कोणताही वेळ न घालवता, विश लिस्ट तुम्हाला प्रॉडक्ट निवडण्यास मदत करू शकेल.

अपडेट राहा : सेलच्या नवीन अपडेटसाठी Flipkart Big Billion Days मायक्रोसाइटवर लक्ष ठेवा.

त्यामुळे या सेलची (Big Billion Days Sale) वाट पाहा आणि डिस्काउंटसह वस्तू विकत घ्या.