Flipkart Upcoming Sale: शॉपिंग करण्यासाठी तुम्ही एखाद्या सेलची वाट पाहत असाल तर फ्लिपकार्टवर लवकरच ‘बिग सेविंग डे’ सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट देण्यात येणार आहे. यामध्ये टीव्ही आणि फ्रिजवर ७५ टक्क्यांपर्यंत तर इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर ८० टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या आधी ‘बिग सेविंग डे’ सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये फोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर प्रोडक्ट्सवर बम्पर डिस्काउंट देण्यात येणार आहे. फ्लिपकार्ट प्लस युजर्ससाठी या सेलचा ऍक्सेस एक दिवस आधी मिळणार आहे.
किती मिळणार बँक डिस्काउंट?
आयसीआयसीआय बँक आणि सीटी बँकेच्या कार्डवर सुट देण्यात येणार आहे. या दोन्ही बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १० टक्क्यांचा डिस्काउंट मिळेल. ऍक्सिस बँकच्या कार्डवर ५ टक्क्यांचा डिस्काउंट आहे.
या सेलमध्ये स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काउंट देण्यात येणार आहे. ऑफर्स अजुनही लाईव्ह झालेल्या नाहीत. कंपनीकडुन आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लससाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.