scorecardresearch

Flipkart Electronics Sale: ५४० रुपयांमध्ये खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला Oppo A53s 5G स्मार्टफोन

Oppo A53s 5G हा फोन १८,९०० रुपयांऐवजी केवळ ५४० रुपयांमध्ये खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता.

Oppo A53s 5G हा एक अप्रतिम ५जी स्मार्टफोन आहे.(photo credit: financial express)

२७ जानेवारीपासून फ्लिपकार्टवर एक विशेष ‘इलेक्ट्रॉनिक्स सेल’ सुरू झाला आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून ते स्मार्ट टीव्ही, फ्रीज आणि एसीपर्यंत सर्व गोष्टींवर सूट दिली जात आहे. आज आम्ही स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. फ्लिपकार्टच्या विक्रीसह, Oppo A53s 5G हा फोन १८,९०० रुपयांऐवजी केवळ ५४० रुपयांमध्ये खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता. चला या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Oppo A53s 5G वर भारी सवलत

Oppo A53s 5G बाजारात १८,९०० रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमधून हा १२८ जिबी इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन विकत घेतल्यास, तुम्हाला तो १५ टक्के डिस्काउंटनंतर १५,९९० मध्ये मिळेल. या डीलमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही फोनची किंमत आणखी कमी करू शकता.

अशा प्रकारे खरेदी करा फक्त ५४० रुपयांना हा स्मार्टफोन

या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुमचा जुना स्मार्टफोन बदलून तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करून १५,४५० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुम्ही Oppo A53s 5G हा स्मार्टफोन १८,९९० रुपयांऐवजी केवळ ५४० रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Oppo या स्मार्टफोनची फीचर्स

Oppo A53s 5G हा एक अप्रतिम ५जी स्मार्टफोन आहे. जो ८जिबी RAM आणि १२८ जिबी अंतर्गत स्टोरेजसह येतो. MediaTek Dimensity ७०० प्रोसेसरद्वारे समर्थित हा स्मार्टफोन ६.५२ इंचाचा HD+ डिस्प्ले आणि शक्तिशाली ५,०००mAh बॅटरीसह येतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये मुख्य सेन्सर १३MP चा असेल, दुसरा सेंसर २MP चा असेल आणि तिसरा २MP चा असेल. हा ड्युअल सिम स्मार्टफोन ९MP फ्रंट कॅमेरा सह येतो.

फ्लिपकार्टचा हा इलेक्ट्रॉनिक्स सेल जानेवारीपासून सुरू झाला आहे आणि त्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flipkart electronics sale buy oppo as53s 5g in rs 540 instead of rs 18990 check amazing offer scsm

ताज्या बातम्या