फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल लवकरच सुरू होणार आहे आणि यात मोठमोठ्या कंपन्यांच्या फोन्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. यात गुगल पिक्सेल ६ ए चा देखील समावेश आहे. नुकतेच गुगलने हा स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. हा ५ जी फोन असून त्यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ४३ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. मात्र काही बाबी केल्यास तुमची मोठी बचत होऊ शकते.

फ्लिपकार्टच्या ट्विटर हँडलनुसार सध्या गुगल पिक्सेल ६ ए च्या स्मार्टफोनची किंमत ४३ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र, बिग बिलियन डे सेलमध्ये गुगल पिक्सेल ६ ए ची स्पेशल किंमत ३४ हजार १९९ रुपये इतकी असणार आहे. सेलमध्ये फ्लिपकार्ट या मोबाइलवर चक्क ९ हजार ८०० रुपयांची सूट देत आहे. मात्र, फ्लिपकार्टकडून मिळणाऱ्या ऑफर्सच्या माध्यमातून ही किंमत आणखी कमी करता येणार आहे.

असे केल्यास अजून बचत होईल

(One plus 11 pro मध्ये असणार हटके कॅमेरा आणि दमदार फीचर; पाहा लिक डिझाईन)

प्रिपेड ट्रान्झॅक्शन्सवर ३ हजार ५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच अॅक्सिस कार्ड किंवा आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरल्यास अजून ३ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. या सर्व सूट नंतर गुगल पिक्सेल ६ एची किंमत २७ हजार ६९९ इतकी कमी होणार आहे. म्हणजेच ४३ हजार ९९९ रुपयांचा हा दमदार ५ जी फोन चक्क २७ हजार ६९९ रुपयांना मिळणार आहे. फोनवर एकूण १६ हजार ३०० रुपयांची बचत होणार आहे.

हे आहेत फिचर्स

गुगल पिक्सेल ६ए हा फोन कॉर्निंग गोरीला ग्लास ४ सुरक्षेसह येतो. याने फोन पडल्यास स्क्रिनला काही प्रमाणात सुरक्षा मिळते. फोनला ६.१ इंचची फूल एचडी ओलइडी स्क्रिन आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर मागील भागात १२.२ मेगापिक्सेलचा प्राइमरी सेंसर आणि १२ मेगापिक्सेलचा सेकेंडरी लेन्स आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारी ४ हजार ४१० एमएएची बॅटरी देखील आहे.