अ‍ॅप्स आणि इंटरनेटच्या या युगात, कोणतेही अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेल आयडीने लॉग इन करावे लागेल आणि त्यामुळे क्वचितच असे लोक असतील ज्यांचे ईमेल अकाउंट नसेल. बहुतांश लोक गुगलची मेलिंग सेवा जीमेल वापरतात. जीमेलवर मेल पाठवण्यासाठी आणि मेल मिळवण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. आज आपण अशाच एका ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय जीमेलवर मेल पाठवू शकाल.

अनेक लोक जीमेल वापरतात परंतु इंटरनेटशिवायही तुम्ही मेल पाठवू आणि प्राप्त करू शकता हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज आपण जीमेलच्या ऑफलाइन मोडबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही जीमेलवर इंटरनेटशिवाय आलेले मेल वाचू शकता, त्यांना उत्तर देऊ शकता आणि मेल शोधू शकाल. हे कसे करता येईल ते जाणून घेऊया.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
How To Use Quick Share feature on Android to quickly send files without an active internet connection
दोन फोनमध्ये करा Quick Share; ॲप अन् इंटरनेटचीही गरज नाही, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या

Google ला टक्कर देण्यासाठी Apple लवकरच आणणार स्वतःचे सर्च इंजिन; जाणून घ्या तपशील

फॉलो करा या पाच स्टेप्स :

स्टेप १: जीमेल ऑफलाइन वापरण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या कंप्युटरवर किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम डाउनलोड करावे लागेल. जीमेल ऑफलाइन फक्त क्रोम ब्राउझर विंडोमध्ये वापरला जाऊ शकतो, तुम्ही हे फिचर इनकॉग्निटो मोडमध्ये वापरू शकत नाही.

स्टेप २: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर क्रोम विंडो उघडल्यानंतर, तुम्हाला जीमेल ऑफलाइन सेटिंग्जवर जावे लागेल किंवा ‘https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline’ या लिंकवर क्लिक करावे लागेल.

स्टेप ३: तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. या विंडोमध्ये ‘ऑफलाइन मेल एनेबल करा’ असा पर्याय असेल. आता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप ४: आता तुम्हाला तुमच्यानुसार सेटिंग्ज बदलावी लागतील किंवा कस्टमाइझ करावी लागेल. तुम्हाला किती दिवसांचे मेल सिंक करायचे आहेत ते तुम्ही येथे निवडू शकता जेणेकरून तुम्हाला त्या दिवसांचे मेल ऑफलाइन मोडमध्येही मिळू शकतील.

स्टेप ५: आता तुम्हाला ‘सेव्ह चेंजेस’ हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करायचे आहे.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा जीमेल ऑफलाइन मोड अ‍ॅक्टिव्हेट कराल आणि ते सहजपणे वापरु शकाल.