आजकाल लोकांसाठी Gmail खाते खूप महत्वाचे आहे. त्यात जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे ईमेल आयडी आहे आणि त्यापैकी बहुतेकजण त्यांच्या कामांसाठी फक्त Gmail वापरतात. तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते Gmail खात्याने साइन अप करतात. तुम्हीही जीमेल वापरत असाल तर ही सुरक्षा ट्रिक तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ही ट्रिक वापरून, तुम्ही तुमच्याशिवाय तुमच्या Gmail खात्यात कोण प्रवेश करत आहे हे शोधू शकता. चला जाणून घेऊया या ट्रिकबद्दल..

Gmail खाते ठेवा सुरक्षित

तुमचे जीमेलवर खाते असल्यास, तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की जीमेल आयडी आणि पासवर्ड इतर अनेक अॅप्सशी जोडलेले आहेत. आपण प्रत्येक अॅप डाउनलोड करतो, सोशल मीडिया वापरतो, आपले जीमेल खाते आणि पासवर्ड तिथे वापरले जातात. तुम्ही तुमचे जीमेल अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचे हे एक फार मोठे कारण आहे. जर तुमचे जीमेल अकाउंट हॅक झाले असेल तर तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच

या सोप्या ट्रिक्स फॉलो करा

तुमच्याशिवाय तुमच्या जीमेल खात्यात कोण प्रवेश करत आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर ही सोपी युक्ती वापरा. सर्वप्रथम, Gmail वर जा, ‘Security’ या पर्यायावर क्लिक करा, ‘Manage devices’ निवडा आणि तुमचे Gmail खाते कोणत्या डिव्हाइसवर लॉग-इन केले आहे ते तपासा. तुम्ही ओळखत नसलेले एखादे डिव्हाइस तुम्हाला येथे दिसल्यास, ते ताबडतोब काढून टाका आणि त्या डिव्हाइसवरून तुमचा जीमेल आयडी काढून टाका.

‘लास्ट अकाऊंट’ अ‍ॅक्टिव्हिटी तपासून तुमचे जीमेल खाते शेवटचे कधी अॅक्सेस केले गेले हे देखील तुम्ही शोधू शकता. जर तुम्ही त्यावेळी जीमेल ओपन केले नसेल तर तुमचे खाते कोणत्या ठिकाणाहून अॅक्सेस केले आहे हे तुम्हाला कळेल.