मोबाइल हा दैनंदिन जीवनातील अगदीच महत्वाचा भाग आहे. शाळेपासून ते ऑफिसपर्यंत बऱ्याच महत्वाच्या गोष्टींसाठी मोबाइलमध्ये सोशल मीडिया ॲपवर अनेक ग्रुप तयार केले जातात. त्यामुळे घर बसल्या अनेक गोष्टी आपण सहज करू शकतो; तर विविध मोबाइल कंपन्यादेखील युजर्ससाठी नवनवीन फिचर, खास वैशिट्ये असणारे स्मार्टफोन लाँच करत असतात. तर जर तुम्ही एखादा वनप्लसचा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वनप्लस लवकरच वनप्लस १२ (OnePlus 12) लाँच करणार आहे. आपल्या ग्राहकांसाठी वनप्लस कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन्स भारतासह जागतिक बाजारामध्ये लाँच करत असते.

वनप्लस लवकरच ‘वनप्लस १२’ (OnePlus 12) लाँच करणार आहे. तसेच कंपनीने या स्मार्टफोनच्या काही वैशिष्ट्यांचे संकेतसुद्धा दिले आहेत. आता कंपनीने वनप्लस १२ (OnePlus 12) ची अधिकृत लाँच तारीख सांगितली आहे. कंपनी वनप्लस १२ (OnePlus 12) ४ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. कारण कंपनी या दिवशी त्यांचा ‘१० वा वर्धापन दिनाचा कार्यक्रमदेखील साजरा करणार आहे.कंपनीने चीनमध्ये आयोजित केलेल्या कॉन्फरन्समध्ये आपल्या आगामी फ्लॅगशिप फोनची घोषणा केली होती, तर वनप्लस १२ (OnePlus 12) चे लाँचिंग चीनच्या बाजारपेठेत करण्यात येईल; जे कंपनीचे प्रमुख ली जी लुईस ( Li Jie Louis) यांनी स्पष्ट केले आहे. भारतातील लाँचबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही. तरीही वनप्लस११ (OnePlus 11) चा उत्तराधिकारी भारतात लाँचसाठी येणार, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. वनप्लस ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे, म्हणूनच कंपनी भारतात आपला आगामी फोन लाँच करणे चुकवणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
pipeline laying work, Pune-Solapur route, traffic on Pune-Solapur route,
जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे आजपासून पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत बदल
vodafone sells 3 percent stake in indus tower
व्होडाफोनकडून इंडसमधील ३ टक्के हिस्सा विक्री

हेही वाचा…‘गूगल फोटोज’वर तुमचे खास जुने फोटो सेव्ह करायचेत? मग फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स…

वनप्लस११ (OnePlus 11) ची भारतात फेब्रुवारी २०२३ मध्ये घोषणा करण्यात आली होती, तर वनप्लस १० प्रो (OnePlus 10 Pro) आणि वन प्लस ९ (OnePlus 9) गेल्यावर्षी मार्च महिन्यात लाँच केले होते. तसेच असे सांगितले जाते आहे की, वनप्लस १२ (OnePlus 12) जागतिक लाँच (Global launch) जानेवारीमध्ये होऊ शकते. कंपनीने खूपच लवकर जागतिक लाँचबद्दल माहिती दिली आहे. पण, चांगली गोष्ट अशी की, वनप्लस १२ (OnePlus 12) भारतात लाँच होण्याआधी काही महत्त्वाचे फिचर्स वापरकर्त्यांना आधीच माहीत असतील.

वनप्लस १२ (OnePlus 12) मधील काही खास वैशिष्ट्ये :

वनप्लस १२ (OnePlus 12) बीओईचा (BOE) नवनीत एल्टीपो ओएलडी (LTPO OLED) डिस्प्ले आणि एक्स१ (X1) ओरिएंटल स्क्रीन असेल. तसेच यामध्ये २,६००० नीट्सचा (2,600nits) पीक ब्राइटनेस लेव्हलसह या डिव्हाइसमध्ये डिस्प्लेमेट ए प्लस (A+) सर्टिफिकेशन आणि २ के (2K) रिझोल्यूशन असलेला डिस्प्ले असणार आहे. वनप्लस कंपनीचे चीनचे अध्यक्ष ली जी लुईस यांनी वनप्लस १२ (OnePlus 12) मध्ये ६४ मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा (64-megapixel periscope telephoto lens ) समावेश असेल असे सांगितले आहे. तसेच यात कमी प्रकाशात उत्तम फोटो काढण्यासाठी हा फोन उत्तम ठरेल. तसेच वनप्लस कंपनीने पेरिस्कोप झूम कॅमेर्‍याची क्षमता दर्शविणारे काही कॅमेरा नमुनेदेखील जारी केले आहेत.

वनप्लस १२ कॅमेरावर एक ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे. यात ओआयएस सपोर्टश ५० मेगापिक्सल ( 50-megapixel), सोनी एल्व्हायटी ८०८ (Sony LYT-808) सेन्सर आणि (50-megapixel) मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सोनी आयएमएक्स ५८१ (IMX581) सेन्सर आहे. तसेच फ्रंट कॅमेरावर ३२ मेगापिक्सलचा (32-megapixel) सेल्फी सेन्सर असू शकतो. कारण, हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा उपलबद्ध असेल. तसेच १०० डब्ल्यू 1(00W) वायर्ड चार्जिंग आणि ५० डब्ल्यू (50W) वायरलेस चार्जिंगनुसार ५,४०० एमएएच (5,400mAh) बॅटरी असू शकते. तर कंपनी लवकरच वनप्लस १२ हा हटके स्मार्टफोन लाँच करेल

Story img Loader