Google Down: नेटकऱ्यांचं लोकप्रिय सर्च इंजिन असलेलं गूगलसह, गूगल मॅप्स, युट्युब, जीमेल डाऊन झालं आणि काही मिनिटांसाठी अनेकांचं काम ठप्प झालं. शुक्रवारी म्हणजेच आज ३१ मे २०२४ रोजी जवळपास ६ वाजता सर्च इंजिन गूगलसह ॲप्स तब्बल २५ मिनिटांसाठी डाऊन झाले होते. दरम्यान, कंपनीकडून तात्काळ याप्रकाराची दखल घेण्यात आली. त्यानंतर काही काळातच गुगलच्या सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या. त्याच वेळी, सेवा अचानक बंद झाल्यामुळे, जागतिक स्तरावर अनेक वापरकर्त्यांना समस्यांना सामोरं जावं लागलं. मात्र, गूगल डाऊन होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

गूगल डाऊन होताच नेटकऱ्यांची एक्स (ट्विटर) वर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करण्यास सुरुवात झाली. काही युजर्सनी ट्विटरवर गूगल सर्च इंजिनचे स्क्रिन शॉर्ट्स शेअर करण्यास सुरुवात केली. अनेकांनी ‘फक्त माझ्याकडे गूगल डाउन झालं आहे का’ असे विचारत कॅप्शनसह पोस्ट शेअर केल्या. तर काहींनी गूगलवर बातम्या दिसत नाहीत अशी देखील तक्रार स्क्रिनशॉट शेअर करत दिली आहे. एकदा पाहाच युजर्सनी शेअर केलेल्या पोस्ट…

हेही वाचा…Netflix plans 2024: फक्त १४९ रुपयांत मिळणार नेटफ्लिक्सचे ‘मोबाईल सबस्क्रिप्शन’; जबरदस्त फायदे अन् ‘या’ चार प्लॅन्सची यादी पाहाच

पोस्ट नक्की बघा…

जगभरातील गुगल सेवा बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही वापरकर्त्यांनी गुगल सर्च, मॅप्स, यूट्यूब, न्यूज आणि जीमेल आणि बरेच काही यासह Google सेवांमध्ये प्रवेश करताना समस्या आल्याची तक्रार केली आहे. डाउनडिटेक्टरच्या मते, क्राउड सोर्स्ड आउटेज डिटेक्शन प्लॅटफॉर्म, वापरकर्त्यांना जीमेल, Google सर्च, मॅप्स आणि बरेच काही सारख्या गुगल सेवा वापरण्यात संध्याकाळी ६ वाजल्यापासून समस्या येत होत्या. त्यामधील ६६ टक्के लोक रिपोर्टर्सना गुगल वेबसाइटवर समस्या तर २१ टक्के लोकांना गूगलवर सर्च करण्यात समस्या आणि उर्वरित ३ टक्के लोकांना गूगल मॅप्स एक्सेस करण्यात समस्या येत होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा अशा समस्या आल्या की, आपण मोबाईल फ्लाईट मोडवर टाकतो, तर लॅपटॉप रिस्टार्ट करून पाहतो. पण, सध्या सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण ट्विटर द्वारे एखादा स्क्रिनशॉट शेअर करुन ही समस्या फक्त आपल्या बरोबर घडते का याची तपासणी करून पाहू शकतो. सहा दरम्यान जेव्हा गूगल आणि इतर काहीस ॲप्स सुरु होण्यात समस्या जाणवल्यावर काही युजर्सनी सुद्धा असंच केलं. पण, ही समस्या अवघ्या २५ मिनिटांत पुन्हा पहिल्यासारखी चालू झाल्याचे दिसून आले.