नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतामध्ये अनेक स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. आता चालू असलेल्या Amazon आणि Flipkart च्या सेलमध्ये या फोनवर भरघोस ऑफर सुरु आहेत. तुम्ही जर नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल तर सध्या ४ फोन खूप चर्चेत आहेत. तुम्ही हे चार फोन घेतलेत तर त्यात अनेक चांगले फीचर्स कंपन्यांनी दिले आहेत. तर ते ४ फोन कोणकोणते आणि कोणत्या कंपनीचे आहेत ते आपण जाणून घेऊयात.

Google Pixel 7 Pro

Google Pixel 7 Pro हा यावर्षी लाँच झाला असून, या फोनचा कॅमेरा खूप पॉवरफुल आहे. याफोनच्या कॅमेऱ्यामधून कोणत्याही वेळी फोटो आणि व्हिडीओ घेता येऊ शकतो. या फोनच्या बॅटरीची क्षमता ही ५०००mAh इतकी आहे. आकर्षक डिझाईन, अँड्रॉइड ओएस आणि ४ वर्षांची सिक्युरिटी अपडेट्स देण्यात आले आहे. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत ८४,९९९ रुपये इतकी आहे. फिलपकार्टच्या सेलवर या फोनवर चांगली सूट मिळत आहे.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

हेही वाचा : Xiaomi च्या रिपब्लिक डे सेलला सुरुवात; स्मार्टफोन्स आणि TV च्या खरेदीवर मिळतेय ‘इतकी’ सूट; जाणून घ्या

iPhone 14 Pro

विश्वास, लॉन्ग लाईफ आणि प्रायव्हसी हे आयफोनचे प्रमुख स्तंभ आहेत. हा असा फोन आहे की जो जगामध्ये स्टेट्स सिम्बॉल म्हणून ओळखला जातो. यामध्ये ओएलईडी डिस्प्ले तसेच उत्कृष्ट कॅमेरा असे फीचर्स येतात. आयफोन १४ प्रो हा फोन चार प्रकारांच्या स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. बेस मॉडेल हे १२८ जीबी स्टोरेजचे असून त्याची किंमत १,२९,९०० रुपयांपासून सुरु होतात.

iPhone 14 Plus

आयफोन १४ प्रो बद्दलचे फीचर्स आयफोन १४ प्लस ला सुद्धा लागू होतात. या फोनची किंमत आयफोजन प्रो पेक्षा कमी असल्यामुळे यामध्ये फीचर्सही काही प्रमाणात कमी असतात . १२०Hz डिस्प्ले , अल्ट्रा वाईड कॅमेरा अशी फीचर्स येत नाहीत. आयफोन १४ प्रो च्या तुलनेत आयफोन १४ प्लस स्वस्त आहे. आयफोन १४ प्लसच्या १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही ८९,९०० रुपये आहे. हाच फोन तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ऑफरमध्ये ७१,००० रुपयांना खरेदी करू शकता.

हेही वाचा : Amazon And Flipkart Sale: Sony पासून OnePlus पर्यंत ‘या’ ऑडिओ डिव्हाइसवर मिळतेय भरघोस सूट

Samsung Galaxy Z Flip 4

Samsung Galaxy Z Flip 4 हा एक फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यामध्ये स्क्रीन थोडी मोठी येते. फोल्डेबल असल्याने तुमच्या खिशात हा सहजरित्या बसू शकतो. याची बॅटरी ३७००mAh इतक्या क्षमतेची आहे. एकदा चार्जिंग केले की, एक दिवस बॅटरी वापरता येते. याचा कॅमेराची क्वालिटी देखील अपग्रेड करण्यात आली आहे.