गुगल ही दिग्गज टेक कंपनी आहे. गुगलने आपल्या पुढील जनरेशनमधील फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 8 सीरिजच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. पिक्सेल ८ लाइनअप बेस आणि प्रो मॉडेलसह ऑक्टोबर २०२२ मध्ये रिलीज झालेल्या पिक्सेल ७ सिरीजची जागा घेण्यासाठी तयार आहे. ४ ऑक्टोबर रोजी गुगल पिक्सेल आपली नवीन सिरीज पिक्सेल ८ सिरीज भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्चिंगआधीच गुगल पिक्सेल ८ सिरीज प्री ऑर्डरसह फ्लिपकार्टवर लिस्टेड करण्यात आला आहे. सिरीज लॉन्च झाल्याच्या एका दिवसानंतर खरेदीदार ५ ऑक्टोबरपासून फोन प्री ऑर्डर करू शकणार आहेत.

गुगल पिक्सेल ८ सिरीज: फ्लिपकार्ट

८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल २०२३ सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्सबद्दल काही खुलासे देखील करत आहे. फ्लिपकार्टने नुकतेच बहुप्रतीक्षित अशी गुगल पिक्सेल ८ सिरीज वेबसाइटवर दाखवण्यास सुरुवात केली आहे. ”पिक्सेल ८ सिरीज. याची प्री-ऑर्डर ५ ओक्टोबरपासून सुरू होईल.” शक्तिशाली अशा नवीन पिक्सेल फोनमध्ये गुगल AI आणि आतापर्यंतचा अ‍ॅडव्हान्स कॅमेरा असणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : VIDEO: प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी लॉन्च होणार Google Pixel 8 सिरीज, जाणून घ्या

गुगल पिक्सेल ८ आणि गुगल पिक्सेल ८ प्रो प्रेस रेन्डर्स

याआधी WinFuture स्मार्टफोन्सचे प्रेस रेन्डर्स लीक झाले होते. प्रेस रेन्डर्सने आगामी लॉन्च होणारे दोन्ही फोन वेगवेगळ्या रंगात दाखवले आहेत. गुगल पिक्सेल ८ कदाचित चार वेगवगेळ्या तर गुगल पिक्सेल ८ प्रो तीन रंगांमध्ये लॉन्च होऊ शकतो. प्रेस रेंडरने पिक्सेल वापरकर्त्यांना परिचित असलेल्या डिझाइनमध्ये दोन्ही फोन दाखवले. डिझाइनमध्ये काही सूक्ष्म बदल करण्यात आले आहेत. दोन्ही फोन्समध्ये स्लिम बेझल आणि पंच होल नॉच डिझाइन देण्यात आले आहे.

गुगल पिक्सेल ८ सिरीज : किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

अपकमिंग स्मार्टफोन असणाऱ्या गुगल पिक्सेल ८ सिरीजमध्ये लीक झालेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार गुगल पिक्सेल ८ मध्ये वापरकर्त्यांना ६.१७ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळेल. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असेल. दुसरीकडे गुगल पिक्सेल ८ प्रो मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असेल.

हेही वाचा : WhatsApp ची मोठी कारवाई; भारतात तब्बल ७४ लाखांपेक्षा अधिक अकाउंट्सवर घातली बंदी, काय आहे कारण?

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. गुगल पिक्सेल ८ मध्ये अल्ट्रा वाइड अँगल शॉट्ससाठी सोनीचा IMX386 सेंसरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. पिक्सेल ८ प्रो मध्ये ६४ मेगापिक्सल आणि ४८ मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल सह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

गुगल पिक्सेल ८ आणि गुगल पिक्सेल ८ प्रो च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास गुगल पिक्सेल ८ ची किंमत EUR ७९९ युरो (सुमारे ७०,२०० रुपये ) असण्याची शक्यता आहे. तर गुगल पिक्सेल ८ प्रो ची सुरुवातीची किंमत EUR १,०९९ (सुमारे ९६,५०० रुपये ) असण्याची शक्यता आहे. या फोनच्या किंमती व फीचर्स हे सध्या लीक झालेल्या रिपोर्टनुसार आहे. फोन ४ तारखेला जेव्हा लॉन्च होतील तेव्हाच याबद्दल खरेदीदारांना स्पष्टता येईल.

Story img Loader