Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण ती गुगलवर शोधात असतो. तसेच गेम, फिटनेस किंवा अन्य संबंधित App डाउनलोड करतो ते गुगल Play store वरून करतो. अँड्रॉइड फोनमध्ये आढळणारे App स्टोअर म्हणजेच Google Play Store चा सर्व्हर डाउन झाला आहे.
ही समस्या जगभरातील वेब आणि मोबाईल वापरकर्त्यांना येत आहे. वेबसाइट किंवा App आउटेज आणि डाऊन्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, २५०० पेक्षा अधिक लोकांनी प्ले स्टोअर डाउन असल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अनेकांना अजूनही प्ले स्टोअर उघडण्यात अडचण येत आहे. तसेच Apps डाउनलोड करण्यात देखील अडचणी येत आहेत. मात्र सध्या कंपनीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही आहे.