Google Read Doctor Prescription : डॉक्टरांचे हस्तलिखित हे अनेकांना गोंधळात टाकते. त्यांनी प्रेस्क्रिप्शनवर काय लिहिले आहे हे चटकन ओळखू येत नाही. मात्र, या समस्येवर गुगल मदत करणार आहे. गुगलने काल भारतात इव्हेंट आयोजित केला होता, त्यामध्ये गुगलने लोकांना फायदेशीर ठरेल अशा काही फीचर्सची घोषणा केली होती. डॉक्टरांचे हस्तलिखित समजण्यासाठी लोकांची मदत करण्याची इच्छा देखील गुगलने व्यक्त केली. गुगल हे कसे करणार? जाणून घेऊया.

गुगलनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे डॉक्टरांचे हस्तलेखन समजण्यात मदत करतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे प्रेस्क्रिप्शनमधील औषधे ओळखण्यात आणि त्यांना हायलाइट करण्यात लोकांना मदत करेल. हे नवीन फीचर युजरला गुगल लेन्सच्या माध्यमातून वापरता येईल. लोकांना केवळ प्रेस्क्रिप्शनचे छायाचित्र काढावे लागेल आणि त्यास फोटो लायब्ररीमध्ये अपलोड करावे लागेल. हे काम झाल्यावर अ‍ॅप प्रेस्क्रिपशनचे छायाचित्र शोधेल आणि त्यावरील औषधांचे तपशील उघड करेल.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

(डिलीट झालेला मेसेज परत दिसेल, ‘असे’ वापरा Whatsapp Accidental Delete फीचर)

मात्र, या तंत्रज्ञानाद्वारे दिलेल्या माहितीवर कोणताही निर्णय एकट्याने घेतला जाणार नाही, असे गुगल म्हणाले. हे फीचर कधी रिलीज होणार याबाबत गुगलने माहिती दिलेली नाही. याबाबत बोलताना, युजरला प्रेस्क्रिपशन समजण्यासाठी आम्ही फार्मासिस्टसह काम करत आहोत, असे गुगलने सांगितले.

अँड्रॉइड फोनमध्ये Pre Installed असणार डिजिलॉकर

शासकीय, महाविद्यालीन दस्तऐवज ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिलॉकर स्टोअरेज सेवेचा वापर केला जातो. डिजिलॉकर अ‍ॅप उपलब्ध असून ते डाऊनलोड करून त्यात तुम्ही कागदपत्रे ठेवू शकता. परंतु, भविष्यात अँड्रॉइडमधील फाइल अ‍ॅपमध्ये डिजिलॉकर सेवा उपलब्ध करणार, अशी घोषणा गुगलने सोमवारी गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये केली आहे.

नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजनसह भागीदारीसह गुगलला लोकांना सरकराने जारी केलेली कागदपत्रे जसे पॅन, पासपोर्ट, आधार किंवा इतर कोणतीही कागदपत्रे सहजरित्या स्मार्टफोनमधून वापरू द्यायची आहेत. शेकडो फायलींमध्ये ओळखपत्र शोधण्यासाठी जो वेळ जातो तो वाचवणे हा या सहयोगामागचा विचार आहे.

(Flashback 2022 : ‘हे’ आहेत २०२२ मधील Top Smartphones, अनोख्या फीचर्समुळे लोकांची जिंकली मनं, पाहा यादी)

फाइल्स अ‍ॅप वापरकर्त्याचे सरकारी दस्तऐवज ओळखण्यास सक्षम असेल आणि त्यांना एका सुरक्षित फोल्डरमध्ये संघटित करेल, असे गुगलने सांगितले. अल्गोरिदम फाइल्स अ‍ॅपमध्ये ठेवलेल्या डॉक्युमेंट्समधून युजरचा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड डेटा ओळखण्यासाठी सक्षम असेल, असे गुगलने स्पष्ट केले आहे.

गुगलद्वारे फाइल्समध्ये संग्रहित केलेले दस्तऐवज डिव्हाइसवर एका वेगळ्या वातावरणात असतील आणि केवळ एका युनिक लॉकस्क्रिन ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यात प्रवेश मिळवता येईल, असे म्हटले जाते. याचा अर्थ केवळ युजर सोडून इतर कोणालाही दस्तऐवज वापरता येणार नाही.