High Severity Alert For Apple Users : जर तुम्ही ॲपल (Apple) युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने Apple युजर्ससाठी धोक्याची चेतावणी दिली आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीम (CERT-In) ने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. CERT-In द्वारे जारी केलेल्या ॲडव्हायझरीनुसार, अनेक ॲपल उपकरणे – आयफोन (iPhones), आयपॅड (iPads), मॅकबुक (MacBook) आणि अगदी ब्राउझर सफारी यांना धोका आहे. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या या इशाऱ्यानुसार, Apple युजर्सना त्यांचे फोन अपडेट (updates) करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून धोके टाळता येतील.

या इशाऱ्यात नेमकं काय म्हटलं आहे?

ॲपल उत्पादकांमध्ये अनेक सुरक्षा धोके शोधले गेले आहेत आणि आयओएस (iOS), आयपॅडओएस (iPadOS), मॅकओएस (macOS), टीव्हीओएस (tvOS), वॉचओएस (watchOS), व्हिजनओएस (visionOS) आणि सफारीच्या विविध आवृत्त्यांमध्ये त्यावर उपाय करण्यात आले आहेत,” असं या इशाऱ्यात म्हटलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

तर हे धोके व्यक्ती आणि संस्थांमध्ये Apple उत्पादने वापरणाऱ्यांवर लक्ष्य करतो आणि त्यांना माहिती आणि सेवा पुरवण्यास अडथळा निर्माण करतो. या इशाऱ्यात म्हटलं आहे की, या सुरक्षा दोषामुळे युजर्सना संवेदनशील माहिती (सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन) अधिकृत प्रवेश, सेवेत अडथळा आणि डेटा बदलण्याचा धोका उद्भवू शकतो.

हेही वाचा…How To Find Wi-Fi Password: वाय-फायचा पासवर्ड विसरलात का? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा सेव्ह केलेला पासवर्ड

CERT-In च्या इशाऱ्यानुसार, खालील सॉफ्टवेअरवर परिणाम झाला आहे…

ॲपल आयओएस ॲण्ड आयपॅड व्हर्जनचे 18.1 च्या आधीचे मॉडेल्स
ॲपल आयओएस ॲण्ड आयपॅड व्हर्जनचे 17.7.1 च्या आधीचे मॉडेल्स
ॲपल मॅक Sequoia व्हर्जनचे 15.1 च्या आधीचे मॉडेल्स
ॲपल मॅक Sonoma व्हर्जनचे 14.7.1 च्या आधीचे मॉडेल्स
ॲपल मॅक Ventura व्हर्जनचे 14.7.1 च्या आधीचे मॉडेल्स
ॲपल वॉचओएस व्हर्जनचे 11.1 च्या आधीचे मॉडेल्स
ॲपल टीव्हीओएस व्हर्जनचे 18.1 च्या आधीचे मॉडेल्स
ॲपल व्हिजनओएस व्हर्जनचे 2.1 च्या आधीचे मॉडेल्स
ॲपल सफारी व्हर्जनचे 18.1 आधीचे मॉडेल्स

अशावेळी आयफोन युजर्सनी काय केलं पाहिजे?

ॲपल युजर्सनी लेटेस्ट सॉफ्टवेअरमध्ये स्वतःचा फोन अपडेट करून घ्यावा. ॲपलने अलीकडेच आयफोन युजर्ससाठी iOS 18.1 जारी केले आहे, त्यामुळे पात्र डिव्हाइस युजर्सना त्यांचे iPhone अपडेट करणे आवश्यक आहे.

Story img Loader