scorecardresearch

Honor ने लाँच केला प्रिमियम लूकचा MagicBook X 14 लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honor Laptop : या लॅपटॉपची बॉडी ही अ‍ॅल्युमिनिअम स्वरूपाची येते.

Honor ने लाँच केला प्रिमियम लूकचा MagicBook X 14 लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Honor MagicBook X 14 Laptop – Image Image courtesy Honor.com

Honor कंपनीने भारतात आपला एक नवीन लॅपटॉप लाँच केला आहे. या लॅपटॉपचे नाव Honor MagicBook X 14 असे आहे. हा लॅपटॉप स्लिक असून प्रिमियम लूकमध्ये लाँच झाला आहे. हा लॅपटॉप इंटेल कोरच्या ११ व्य जनरेशनच्या i5 या प्रोसेसरवर चालतो. हा लॅपटॉप ऍडव्हान्स सुपरसाईड कूलिंग सिस्टीममध्ये मोडतो असे कंपनीचे म्हणणे आहे. ज्यात ३८ टक्के हवेचा वापर होण्याचा दावा केला जात आहे. याची बॅटरी ही एका तासामध्ये ६८ टक्के चार्ज होते. यात ६५ वॅटचे टाईप सी चार्जिंग येते.

काय असणार फीचर्स

Honor मॅजिकबुक एक्स १४ हा या लॅपटॉपची बॉडी ही अ‍ॅल्युमिनिअम स्वरूपाची येते. याची जाडी ही १५.९ मिमी असून याचे वजन १.३८ किलो इतके आहे. हे डिव्हाईस १८० डिग्रीमध्ये फिरवता येते. तसेच याचा डिस्प्ले हा १४ इंचाचा फुल कम्फर्ट डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप TUV राईनलँड लो ब्लू लाईट सर्टिफिकेटसह येतो. हा लॅपटॉप ११ व्या जनरेशनचा आहे. यात ४.२Ghz च्या कमाल टर्बो फ्रिक्वेन्सीसह, Intel Iris XE ग्राफिक्स येतात. यामध्ये ५१२जीबी PCIe NVMe SSD सोबतच ८ जीबी ड्युअल चॅनेल DDR4 रॅम येते.

हेही वाचा : Noiseने लाँच केली ‘ही’ दोन स्मार्टवॉच; जाणून घ्या फीचर्स

किती असणार किंमत ?

Honor मॅजिकबुक एक्स १४ या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ही ४५,९९० रुपये असणार आहे. अ‍ॅमेझोन इंडियावर हा लॅपटॉप ४१,९९० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल आणि ही ऑफर २० जानेवारी पर्यंत वैध असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 10:16 IST

संबंधित बातम्या