Google Pay ने अखेर आपली UPI LITE फीचर आपल्या प्लॅटफॉर्मवर सादर केले आहे. या फीचरमुळे लहान किंमतीचे पेमेंट करणे वेगवान आणि सोपे होणार आहे. युपीआय लाईट एक डिजिटल पेमेंट सेवा आहे जिला नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे डिझाईन करण्यात आली आहे. युपीआय लाईट फीचर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर २०२२ मध्ये लॉन्च केले आहे. युपीआय लाईट फिचर गुगल पे ने सुरु केल्यामुळे वापरकर्ते पिन न टाकता आपल्या अकाउंटमधून एका क्लिकवर २०० रुपये ट्रान्स्फर करण्याची परवानगी देते.आज आपण गुगल पे वर UPI LITE फीचर कसे सुरू करायचे त्याबद्दलच्या सोप्या स्टेप्स जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युपीआय लाईट फिचर आता प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचे गुगल पे चे म्हणणे आहे. या फीचरच्या मदतीने कंपनीचे लक्ष्य डिजिटल पेमेंट सोपे, वेगवान आणि विश्वासार्ह बनवण्याचे आहे. हे फिचर गुगल पे वॉर रोलआऊट करण्यात आले आहे. जे वापरकर्त्यांना पिनचा वापर न करता वेगवान आणि एका क्लिकवर पेमेंट करण्यास सक्षम बनवते. हे फिचर वापरकर्त्याच्या बँक अकाउंटशी जोडलेले असेल. परंतु रिअल-टाइममध्ये जारी करणार्‍या बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून राहणार नाही. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

हेही वाचा : Google Pay ने लॉन्च केले UPI Lite फिचर; पिन न टाकताच करता येणार ‘इतक्या’ रूपयांचे पेमेंट

युपीआय लाईट फिचर गुगल पे वर कसे सुरू करायचे ?

गुगल पे वापरकर्ते कोणत्याही KYC शिवाय सहजपणे UPI Lite फिचर सुरू करू शकतात. जाणून घेऊयात सोप्या स्टेप्स.

१. सर्वात पहिल्यांदा तुमच्या डिव्हाइसवर गुगल पे ओपन करावे.

२. गुगल पे ओपन केल्यानंतर तुमचा प्रोफाइल फोटो शोधा व त्यावर क्लिक करा. तंत्र तुमचे प्रोफाइल पेज ओपन होईल.

३. तुमच्या प्रोफाइल पेजवर “UPI LITE” सुरु करण्याचा पर्याय शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा. त्यावर क्लिक करा.

४. UPI LITE बद्दल सूचना आणि डिटेल्ससह एक नवीन स्क्रीन आणि विंडो दिसेल.

५. दिलेली माहिती वाचून झाल्यानंतर हे फिचर सुरू करण्यासाठी तेथील पर्यायावर क्लिक करा.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, १ हजाराचा डिस्काउंट; Infinix कंपनीकडून ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च

६. गुगल पे लिंकिंग प्रक्रियेमध्ये तुम्हाला सूचना देईल. ज्यामध्ये तुमचे बँक खाते लिंक करणे किंवा तुमचे डिटेल्स व्हेरिफाय करणे असू शकते. स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा व आवश्यक माहिती भरून पूर्ण करा.

७. एकदा लिंकिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज किंवा नोटिफिकेशन येईल जे युपीआय लाईट फिचर सुरू झाले आहे असे दाखवेल.

८. आता तुम्ही तुमच्या युपीआय लाईट फीचरच्या अकाउंटमध्ये पैसे अ‍ॅड करू शकता. गुगल पे उघडा आणि युपीआय लाईट सेक्शनवर जा.

९. पैसे अ‍ॅड करण्यासाठी क्लिक करा. त्यामध्ये तुम्ही २ हजारांपर्यंतची रक्कम अ‍ॅड अकरू शकता.

तुमच्या युपीआय लाईट फीचरमध्ये दिवसाला ४ हजार जोडू शकता. युपीआय लाईट फीचरचा वापर करून तुम्ही २०० किंवा त्यापेक्षा कमी किंमतीचे व्यवहार करू शकता. असे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला युपीआय पिन टाकण्याची गरज नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to activate upi lite feature on google pay 200 rs trasanction without pin check details tmb 01
First published on: 15-07-2023 at 14:59 IST