scorecardresearch

Premium

अँड्रॉइड युजर्ससाठी ChatGpt लॉन्च; कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या

OpenAI द्वारे नोव्हेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले आहे. हे एक भाषेवर आधारित चॅटबॉट आहे.

how to download chatghpt on android
चॅटजीपीटी आता अँड्रॉइडवर उपलब्ध (Image Credit-Financial Express)

ChatGPT अँड्रॉइड अ‍ॅप आता भारतात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. आधी हे केवळ आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. आता अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरवरून चॅटजीपीटी विनामूल्य डाउनलोड करू शकतात. वेब व्हर्जनप्रमाणेच वापरकर्ते संभाषणात्मक उत्तर मिळविण्यासाठी एआय-सक्षम चॅटबॉटला कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारू शकतात. वापरकर्ते विशिष्ट प्रॉम्प्ट वापरून प्रतिसादाचा टोन आणि शैली देखील बदलू शकतात. मोबाइल अॅपच्या फायद्यात इंटरनेट नसतानाही जुन्या चॅटमध्ये प्रवेश करणे समाविष्ट आहे. OpenAI ने ChatGPT ची ऑफलाइन आवृत्ती आणल्यास भविष्यातही ते अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

ओपनएआयने केलेल्या ट्विटमध्ये अँड्रॉइड अॅपच्या रोलआउटची घोषणा केली. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ”Android साठी ChatGPT आता अमेरिका, भारत, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. आम्ही पुढील आठवड्यात अतिरिक्त देशांमध्ये रोलआउटचा विस्तार करण्याची योजना आखत आहोत.”

Google Pixel 8 series listed on Flipkart
VIDEO: ४ ऑक्टोबरला लॉन्च होणार गुगल Pixel 8 सिरीज; ५० मेगापिक्सलसह मिळणार…, एकदा पाहाच
iPhone 14 available at Rs 34,399 on flipkart big billion days sale
घाई करा! ‘या’ प्लॅटफॉर्मवर iPhone 14 केवळ ३४,३९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?
whatsapp stop working some android and ios smartphones after 24 october
व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी! २४ ऑक्टोबरनंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही अ‍ॅप; काय आहे कारण?
customers buy iphone 15 series at flipkart apple store and amazon
अ‍ॅपलच्या अधिकृत स्टोअर्ससह ‘या’ प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येणार iPhone 15; आकर्षक ऑफर्स एकदा पाहाच

हेही वाचा : Vodafone Idea च्या ‘या’ फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये ७० जीबी डेटासह मिळणार…

OpenAI द्वारे नोव्हेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले आहे. हे एक भाषेवर आधारित चॅटबॉट आहे. तो आपल्या हव्या असणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देतो. कविता, निबंध लिहून देतो. चॅटजीपीटीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ते लॉन्च झाल्यापासून चार महिन्यांमध्ये कमीत कमी वेळेत १०० मिलियन युजर्स होणारे ते सर्वात वेगवान अँप्लिकेशन बनले आहे. हे GPT-3.5 आणि GPT-4 वर तयार केले आहे. सध्या आत्तापर्यंत, GPT-4 फक्त ChatGPT Plus सदस्यांसाठी उपलब्ध आहे. ज्यांना भारतात महिन्याला मेंबरशिपसाठी १,९९९ रुपये द्यावे लागतील.

अँड्रॉइडवर ChatGpt कसे डाउनलोड करायचे ?

१. सर्वात पहिल्यांदा तुमच्या फोनमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करावे.

२. तिथे चॅटजीपीटी सर्च करावे.

३. तिथे तुम्हाला या Apps दिसतील.

४. त्यामध्ये तुम्ही डाऊनलोड करताना वापरकर्त्यांनी अधिकृत वितरक किंवा विकसक – OpenAI शोधणे आवश्यक आहे.

५. एकदा का App डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड आयडीने लॉग इन करावे.

६. तसेच चॅटजीपीटीवर नवीन असल्यास तुमच्या Apple किंवा Google ID सह साइन अप करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to download openai chatgpt chatbot on android now available india check all features tmb 01

First published on: 26-07-2023 at 15:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×