व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपल्या ओळखीतील बहुतांश सर्वजण व्हॉटसअ‍ॅप वापरतात. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपवरून संवाद साधण्याला प्राधान्य दिले जाते. व्हॉटसअ‍ॅपवर फक्त इंग्रजीतून मेसेज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे तुमचेही मत असेल. पण काही अ‍ॅप्सचा वापर करून तुम्ही मराठी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेतून मेसेज करू शकता. कोणते आहेत असे अ‍ॅप्स जाणून घ्या.

जीबोर्ड (गुगल कीबोर्ड)
गुगल कीबोर्ड हा अँड्रॉइड आणि आयफोनवर वापरण्यात येणारे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप डाउनलोड करून तुम्ही सेटिंगमध्ये भाषेचा पर्याय निवडुन हव्या त्या भाषेत व्हॉटसअ‍ॅपवरुन मेसेज करू शकता.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
what is google wallet app
गूगलचे ‘Google wallet’ नेमके आहे तरी काय? कोणते अँड्रॉइड वापरकर्ते घेऊ शकतात याचा लाभ?
How To Made Homemade Crispy Potato Wafers
१ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
Here's Why You Should Never Reheat Cooking Oil
Reusing Cooking oil: एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का? आरोग्यासाठी ठरू शकते घातक

आणखी वाचा: अनलिमिटेड कॉलिंगसह, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा; जाणून घ्या Vi च्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची किंमत

अ‍ॅप्पल कीबोर्ड
अ‍ॅप्पल कीबोर्डमध्ये भाषेचा पर्याय निवडणे अगदी सोपे आहे. यासाठी सेटींग्स पर्यायामध्ये जाऊन जनरल सेटींग्समध्ये जा त्यानंतर कीबोर्ड पर्याय निवडा. त्यानंतर ‘अ‍ॅड न्यु कीबोर्ड’ पर्याय निवडुन तुम्हाला हव्या असलेल्या भाषेचा पर्याय निवडा. यानंतर व्हॉटसअ‍ॅप उघडून तेथील कीबोर्डवर असणाऱ्या चेंडूसारख्या पर्यायावर लॉंग प्रेस करा, त्यामध्ये कीबोर्ड पर्याय निवडुन हव्या त्या भाषेत मेसेज करू शकता.

मायक्रोसॉफ्ट स्विफ्टकी
मायक्रोसॉफ्ट स्विफ्टकी हे अ‍ॅप देखील तुम्हाला हव्या त्या भाषेत चॅट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. हे अ‍ॅप डाउनलोड करून त्यामध्ये भाषेचा पर्याय निवडा. तुम्हाला हवा त्या भाषेचा पर्याय निवडल्यानंतर व्हॉटसअ‍ॅप उघडा तिथे स्पेस बारवर लॉंग प्रेस करून तुम्ही हव्या त्या भाषेत मेसेज करू शकता.

आणखी वाचा: व्हिडीओकॉल सुरू असताना वापरता येणार दुसरे अ‍ॅप्स; काय आहे WhatsApp चे नवे फीचर जाणून घ्या

सॅमसंग कीबोर्ड
सॅमसंग कीबोर्डमध्ये भाषेचा पर्याय निवडण्यासाठी फोनमधील सेटींग्समध्ये जाऊन ‘सॅमसंग कीबोर्ड’ हा पर्याय सर्च करा. त्यामध्ये ‘लँगवेज अँड टाईप्स’ हा पर्याय निवडा. नंतर मॅनेज इनपुट लँग्वेज पर्यायावर क्लिक करून हव्या त्या भाषेचा पर्याय निवडा. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅपवर जाऊन कीबोर्डवर जाऊन चेंडूसारख्या दिसणाऱ्या पर्यायावर लॉंग प्रेस करून तुम्ही भाषा निवडु शकता.