व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉटसअ‍ॅप वापरत नसतील असे क्वचित काहीजण तुमच्या संपर्कात असतील. वापरण्यासाठी सोपे असणारे आणि सर्वांकडे उपलब्ध असल्यामुळे पटकन संपर्क साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपचा वापर केला जातो. व्हॉटसअ‍ॅपकडुनही युजर्ससाठी सतत नवनवे फीचर लाँच केले जातात. असेच एक व्हिडीओ कॉलशी संबंधित नवे फीचर लवकरच रोल आउट होणार आहे. काय आहे हे फीचर जाणून घ्या.

व्हॉटसअ‍ॅपवरील व्हिडीओ कॉलचा आपण सगळेच वापर करतो, पण हा व्हिडीओकॉल सुरू असताना आपल्याला इतर अ‍ॅप्स वापरता येत नाहीत. जर तुम्ही व्हिडीओ कॉल सुरू असताना बॅक बटण निवडले तर स्क्रिन ऑफ होते. यामुळे व्हिडीओ कॉल सुरू असताना इतर अ‍ॅप्स वापरता येत नाहीत. पण आता यावर लवकरच एक पर्याय उपलब्ध होणार आहे, हा पर्याय म्हणजे व्हॉटसअ‍ॅपचे नवे फीचर. हे फीचर वापरून व्हॉटसअ‍ॅप व्हिडीओ कॉल सुरू असताना इतर अ‍ॅप्स वापरता येणार आहेत.

Patient Sexually Harassed Indian Nurse She Shuts Him Down Saying I love India Vulgar Remarks Make Netizens Angry Over Viral Video
“भारत बेडवर चांगला नाही, जर मी..”, नर्ससमोर अश्लील भाषेत बोलणाऱ्या रुग्णाचा Video व्हायरल; नर्सने शेवटी..
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
couple romance at noida delhi metro station
VIDEO : मेट्रो स्टेशनवर रोमान्स करताना दिसले कपल; एकमेकांना किस करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी संतापले
shocking video
धक्कादायक! भर रस्त्यात दुचाकीवर भयानक स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले..

आणखी वाचा: सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर

व्हॉटसअ‍ॅपच्या या नव्या फीचरचे नाव ‘पिक्चर इन पिक्चर मोड’ आहे. याची माहिती ‘व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फो’कडुन देण्यात आली आहे. हे फीचर सध्या फक्त निवडक आयओएस बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली.