अनेकवेळा असे होते की एकाच पीएनआर नंबरवरून अनेक लोकांची ट्रेनची तिकिटे बुक केली जातात. कुटुंबासोबत किंवा गटाने प्रवास करण्यासाठी असे केले जाते. याने प्रत्येक प्रवाशाला तिकिटीची गरज पडत नाही. पण कधी कधी काही कारणास्तव एक व्यक्तीने प्रवास करण्याचे रद्द केले तर मग त्याची तिकीट कशी रद्द करता येईल, हा प्रश्न उपस्थित होतो. तर अशा वेळेस तिकीट कसे रद्द करावे याबाबत जाणून घेऊया.

तिकीटीचे बुकींग जर रेल्वे काउंटरवरून केले असेल तर ती रद्द करण्यासाठी रेल्वे काउंटरवरच जावे लागेल. पण, जर तिकीट आईआरसीटीसीच्या ई-टिकिटिंग संकेतस्थळावरून बुक केली असेल तर ती ऑनलाइन संकेतस्थळावरून सहज रद्द करता येऊ शकते. अनेक तिकिटांमधून एक तिकीट रद्द करण्याला पार्शियल कॅन्सलेशन असे म्हणतात. यासाठी तुम्हाला आईआरसीटीसीच्या संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल. आयआरसीटीसी चार्ट तयार होईपर्यंत कन्फर्म तिकीट रद्द करण्याची सुविधा देते. तिकीट तुम्ही पुढील प्रक्रियेने रद्द करू शकता.

(आपला मौल्यवान डेटा दुसऱ्याच्या हाती जाऊ देऊ नका, फोन चोरी झाल्यावर ‘हे’ उपाय करा)

असे करा तिकीट रद्द

  • सर्वात आधी irctc.co.in हे भारतीय रेल्वेचे ई टिकिटिंग संकेतस्थळ उघडा.
  • या संकेतस्थळावर योग्य युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
  • आता आपले ई तिकीट रद्द करण्यासाठी ‘माय ट्रॅन्झेक्शनवर’ जा.
  • आता माय अकाउंट मेन्यूमधील ‘बुक तिकीट हिस्ट्री’ लिंकवर क्लिक करा.
  • या सेक्शनमध्ये तुम्हाला बुक केलेल्या तिकीट दिसतील.
  • आता जी तिकीट रद्द करायची आहे ती निवडा आणि ‘कॅन्सल तिकीट’च्या पर्यायावर क्लिक करा.
  • ज्या प्रवाशाचे तिकीट रद्द करायचे आहे, त्याचे नाव निवडून तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करा.
  • प्रवाशाच्या नावापूर्वी ‘चेक बॉक्स’वर क्लिक करा आणि ‘कॅन्सल तिकीट’ बटनवर क्लिक करा.
  • तिकीट रद्द झाली की नाही, हे माहिती करण्यासाठी ‘कन्फर्मेशन पॉपअप’वर क्लिक करा.
  • तिकीट रद्द झाल्यानंतर, कॅन्सलेशन चार्ज घेतला जाईल आणि तिकिटीचे पैसे तुम्हाला परत मिळतील.
  • तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आणि ईमेलवर एक कन्फर्मेशन आणि तिकीट रद्द केल्याचा ईमेल येईल.