Recover Deleted Photo Video Instagram : आपले कौशल्य दाखवण्यासाठी आणि लोकांचे मनोरंजन करण्यासाठी इन्स्टाग्राम हे चांगले प्लाटफॉर्म ठरत आहे. विविध विषयांवरील व्हिडिओ, ट्रेंडिंग आणि व्हायरल व्हिडिओमुळे ते लोकप्रिय होत आहे. इन्स्टाग्रामवर रोज अनेक व्हिडिओ अपलोड होतात. ते वापरताना तुमच्याकडून चुकून व्हिडिओ किंवा फोटो डिलीट झाला असेल तर चिंता करू नका. तुम्ही डिलीट झालेले व्हिडिओ, फोटो परत मिळवू शकता.

तुम्ही डिलीट केलेला कंटेट रिसेंटली डिलिटेड फोल्डरमध्ये जातो. या फोल्डरमध्ये डिलीट केलेला कंटेंट आपोआप डिलीट होण्यापूर्वी ३० दिवस ठेवले जाते. तुम्ही या ३० दिवसांमध्ये इन्स्टाग्राम अ‍ॅपमधील रिसेंटली डिलिटेड फोल्डरमधून डिलीट केलेला कंटेट मिळवू शकता. मात्र, तुम्ही केवळ फोटो आणि हा व्हिडिओ मिळवू शकता. डिलीट केलेले इन्स्टाग्राम मेसेज परत मिळत नाही.

(नवीन फीचर्स मिळणार नाहीच, सुरक्षाही वाऱ्यावर; ३१ डिसेंबरपासून Whatsapp ४९ स्मार्टफोनमध्ये काम करणार नाही)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिलीट केलेला इन्स्टाग्राम कंटेट परत असे रिस्टोअर करा

  • फोनमध्ये इन्स्टाग्राम सुरू करा.
  • प्रोफाइल अ‍ॅक्सेस करण्यासाठी तळाशी उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल किंवा प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा.
  • वरच्या उजव्या कोपऱ्यात टॅप मोर पर्यायावर क्लिक करा.
  • अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल्सवर क्लिक करा आणि नंतर युअर अ‍ॅक्टिव्हिटीवर क्लिक करा.
  • या सेक्शनमध्ये रिसेंटली डिलिटेडवर टॅप करा. वर तुम्हाला जो कंटेट रिस्टोअर करायचा आहे तो निवडा जसे, प्रोफाइल पोस्ट, रिल्स, व्हिडिओ किंवा स्टोरी.
  • यानंतर तुम्हाला जो फोटो, व्हिडिओ रिस्टोअर करायचा आहे त्यावर टॅप करा.
  • सर्वात वरती उजवीकडे टॅप मोर पर्यायावर टॅप करा, नंतर रिस्टोअर टू प्रोफाइल, रिस्टोअर टू रिस्टोअर कंटेटवर क्लिक करा. आता तुम्हाला खात्यामध्ये रिस्टोअर मीडिया दिसून येईल.