आजच्या काळामध्ये स्मार्टफोन ही प्रत्येकाची महत्वाची गरज बनला आहे. आपली अनेक कामे आज स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण होतात. मात्र तुमचा स्मार्टफोन हरवला तर? तुमच्या फोनमध्ये अनेक फोटोज, सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स आणि युपीआय अकाउंट, व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि अन्य डाटा असतो. फोन हरवल्यामुळे तुम्ही नवीन फोन खरेदी करता. नवीन फोन घेतल्यामुळे इतर समस्या दूर होऊ शकतात. मात्र चॅट्ससारखा डाटा रिकव्हर करणे एक कठीण काम असू शकते. विशेषतः तुमचा स्मार्टफोन जर का चोरीला गेल्यास WhatsApp चे चॅट रिकव्हर करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तुमचा अँड्रॉइड किंवा आयफोन स्मार्टफोन चोरीला गेल्यास तर काय केले पाहिजे आणि दुसऱ्या फोनवर तुमचे WhatsApp चॅट कसे रिकव्हर करायचे याबद्दल जाणून घेऊयात.

त्याच नंबरसह नवीन सिम कार्ड घ्यावे

तुमचा स्मार्टफोन चोरीला गेल्यावर सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडरकडे गेले पाहिजे. तिथे जाऊन त्यांना तुमचे सिमकार्ड ब्लॉक करण्यासाठी सांगावे. सिम कार्ड ब्लॉक केल्यामुळे चोर किंवा अन्य कुणीही व्यक्ती अन्य फोनवर याचा वापर करू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप सुरु करण्यासाठी देखील सिम कार्ड ब्लॉक करणे महत्वपूर्ण ठरते. कारण नवीन फोनवर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट व्हेरिफाइड करण्यासाठी एसएमएसच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन मागते. सिम ब्लॉक केल्यांनतर तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरकडून त्याच फोन नंबरसह एक नवीन सिम कार्ड घ्यावे. याबाबतचे वृत्त ने India Today ने दिले आहे.

हेही वाचा : Flipkart Big Billion Days 2023: मोटोरोलाच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार डिस्काउंट, ऑफर्स एकदा बघाच

नवीन सिम कार्ड खरेदी केल्यानंतर नवीन फोनमध्ये इन्सर्ट करावे . तुमच्याकडे आयफोन्स असल्यास जुन्या फोनमध्ये असणाऱ्या Apple आयडीसह नवीन फोनमध्ये लॉग इन करावे. त्याचप्रमाणे अँड्रॉइड वापरकर्त्यांची देखील जुनी फोनमध्ये असणाऱ्या गुगल आयडीनेच नवीन फोनमध्ये लॉग इन करावे. जर का तुम्ही नियमितपणे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे बॅकअप आपल्या आयक्लाऊड आणि गुगल ड्राइव्हमध्ये घेत असाल तर तुम्ही सहजपणे सेव्ह केलेले सर्व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स रिकव्हर करू शकता.

iCloud वरून व्हॉट्सअ‍ॅप चॅट कसे रिकव्हर करायचे?

१. सर्वात पहिल्यांदा नवीन फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल करावे.

२. अ‍ॅप ओपन केल्यावर फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सेट करावे.

३. त्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर व्हेरिफाय करावा लागेल.

४. नंबर व्हेरिफाय केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपला तुमचे कॉन्टॅक्ट, फोटो आणि अन्य डाटा मिळवण्यासाठी परवानगी द्यावी लागेल.

५. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या iCloud मध्ये बॅकअप घेण्यासाठी स्कॅन करेल.

६. त्यानंतर सेव्ह केलेल्या बॅकअपमधून तुमची चॅट हिस्ट्री रिकव्हर करण्यासाठी तुम्चाला सूचना देईल.

हेही वाचा : Airtel च्या ९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये आता ३० नव्हे तर मिळणार ‘इतका’ डेटा, जाणून घ्या

७. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

८. सूचनांचे पालन केल्यानंतर iCloud बॅकअप सिलेक्ट करावे ज्यामुळे तुम्हाला तो रिस्टोअर करता येईल.

९. व्हॉट्सअ‍ॅप तुमचे चॅट्स रिकव्हर करेल.

Story img Loader