How Advanced Chat Privacy Feature Work : व्हॉट्सॲप वापरत नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही. यातील बरेच फीचर्स तुम्हाला इतरांपर्यंत संवाद पोहचवण्यात मदत करतात. पण, दोघांमधील संवाद, फोटो, व्हिडीओ कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचणार नाही याची काळजी सुद्धा व्हॉट्सॲप घेतच असतो. त्यासाठी याआधीही कंपनीने अनेक फीचर्स लाँच केले आहेत. पण, आता सुरक्षा आणखीन वाढवण्यासाठी पुन्हा एकदा भन्नाट फीचर घेऊन आली आहे.

व्हॉट्सॲपवरील चॅट प्रायव्हसी अशी आहे की, तुमचे वैयक्तिक संदेश आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित केले जातात. जेणेकरून फक्त मेसेज पाठवणाऱ्याला आणि मेसेज प्राप्त होणाराच ते मेसेजेस पाहू, ऐकू किंवा शेअर करू शकतो. यासाठी आणखीन बरेच प्रायव्हसची लेअर्स सुद्धा लाँच केले आहेत जसे की, डिसअपेरिंग मेसेज आणि चॅट लॉक. (डिसअपेरिंग मेसेज म्हणजे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला मेसेज पाठवताच काही वेळेनंतर तो मेसेज आपोआप डिलीट होईल),

तर आता कंपनीने तुमच्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी’ फीचर लाँच केले आहे. तसेच हे फीचर चॅट ​​आणि ग्रुप्स दोन्हीमध्ये उपलब्ध असणार आहे. या नवीन सेटिंगमुळे तुमच्या चॅट लीक होणार नाहीत. पण, जेव्हा सेटिंग चालू असते, तेव्हा तुम्ही इतरांना चॅट एक्सपोर्ट करण्यापासून, त्यांच्या फोनवर मीडिया ऑटो-डाउनलोड करण्यापासून आणि एआय फीचर्ससाठी मेसेजेस वापरण्यापासून ब्लॉक करू शकता. अशा प्रकारे चॅटमधील प्रत्येकाला अधिक आत्मविश्वास मिळतो की, चॅटमध्ये बोलण्यात, पाठवण्यात आलेल्या गोष्टी लीक होणार नाहीत किंवा लीक केल्या जाणार नाहीत.

कसे काम करते अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर? (How To Work Advanced Chat Privacy feature )

व्हॉट्सॲप ग्रुप्सचा वापर आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी केला जातो आहे. त्यामुळे अशा ग्रुप्समध्ये जर तुम्हाला कोणी ॲड केलं असेल ज्यांना तुम्ही फार ओळखत नाही. पण, त्या व्यक्ती संवेदनशील स्वभावाच्या असतात, जसे की आरोग्या संबंधित किंवा कम्युनिटी ग्रुप… तुम्ही ज्याच्याशी चॅट करणार आहात त्या व्यक्तीच्या नावावर टॅप करून नंतर ॲडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसीवर टॅप करून ही खास प्रायव्हसी चालू करू शकता. तसेच यात आणखीन काही सेटिंग्स किंवा जोडल्या जाणार आहेत. ही नवीन सेटिंग व्हॉट्सॲपच्या नवीनतम आवृत्तीवरील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.