How To Use DeepSeek : एक आठवड्यापूर्वी लाँच झालेल्या चीनच्या एआय टूल डीपसीकची (DeepSeek)बरीच चर्चा सुरू आहे. चीनचे एआयच्या जगात पाऊल चॅटजीपीटी (ChatGPT) आणि जेमिनी (Gemini) ला टक्कर तर देणार नाही ना यावर आता प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे. कारण – हा गूगल स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेला ॲप ठरतो आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डीपसीक म्हणजे काय? हा ॲप कसा डाउनलोड करायचा? याचे नेमके फायदे काय? तर चला या प्रश्नाची उत्तरे बातमीतून सविस्तर जाणून घेऊया…

DeepSeek म्हणजे काय?

डीपसीक (DeepSeek) हा Hangzhou बेस टेक कंपनीने लाँच केलेला AI चॅटबॉट आहे. हे शहर चीनच्या आग्नेय भागात वसलेले आहे. Hangzhou या कंपनीची स्थापना लियान वेनफेंग यांनी केली होती. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास डीपसीक एआय (DeepSeek AI) चॅटबॉट चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी लाँच करण्यात आले आहे. अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेत हा चॅटबॉट बनवण्यासाठी कमी किंमत मोजावी लागली आहे. संशोधकांच्या मते, चॅटबॉट तयार करण्यासाठी त्यांना फक्त $6 दशलक्ष लागले, जे यूएस-बेस कंपन्यांनी AI वर खर्च केलेल्या रकमेपेक्षा खूपच कमी आहे.

DeepSeek मध्ये सध्या दोन मॉडेल्स R1 आणि R1 Zeroआहेत. युजर्ससाठी R1 मॉडेल उपलब्ध आहे. त्याचबरोबर DeepSeek सध्या पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे कोणतेही पैसे खर्च न करता तुम्ही या चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतो. तसेच हे अमर्यादितसुद्धा असणार आहे. या गोष्टीनेच सध्या सगळ्या युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. चॅटजीपीटीप्रमाणे या चॅटबॉटमध्ये “your free limits are over” असा संदेश तुम्हाला दिसणार नाही. विशेष म्हणजे, चॅटजीपीटी वापरण्यासाठी कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क न भरणारा नियमित वापरकर्ता पाच तासांच्या मर्यादित वेळेतच हा विंडो वापरू शकतो.

डीपसीक तुम्ही ॲप स्टोअरवरून अगदी सहज डाउनलोड करू शकता किंवा वेबवर फक्त chat.deepseek.com. टाईप केल्यास तुम्हाला डीपसीकमध्ये सहज प्रवेश मिळेल.

कसा करायचा डीपसीकचा वापर?

वर नमूद केल्याप्रमाणे DeepSeek वापरण्यासाठी, तुम्ही तुमच्या iPhone वर ॲप म्हणून डाउनलोड करू शकता किंवा वेबवर प्रवेश करू शकता.
तर सगळ्यात पहिले
१. ॲप स्टोअरवर जा
२. सर्च बारवर DeepSeek टाइप करा
३. नंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ॲप दिसेल तेव्हा Get बटण दाबा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेबवरून डीपसीकमध्ये कसा प्रवेश करायचा?

१. तुमच्या ब्राउझरवर chat.deepseek.com टाइप करा
२. त्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यास सांगितले जाईल. तुम्ही तुमचे Google क्रेडेन्शियल्स तेथे टाकू शकता.
३. त्याचा इंटरफेस चॅटजीपीटीसारखाच आहे, तुम्हाला फक्त तुमचे प्रश्न डायलॉग बॉक्सवर टाइप करावे लागतील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी AI चॅटबॉटच्या उत्तराची प्रतीक्षा करावी लागेल.